आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकचा वापर घटवण्यासाठी उपयोगी पडेल नवोन्मेषी सामग्री, प्रदूषणापासून बचाव करेल स्मार्ट ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावोस- जागतिक आर्थिक मंचात या वेळी वाढते प्रदूषण, वातावरण बदल, दहशतवाद, नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर व नोकऱ्यांत समानता प्रमुख मुद्दे चर्चेत राहिले. जगभरातील मोठमोठे देश प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करत आहेत. परिषदेत काही कंपन्यांनी नवोन्मेषी तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली. त्यांचा भर प्रदूषण नष्ट करणे, पर्याय शोधणे, भविष्य सुरक्षित ठेवण्यावर होता प्लास्टिकला पर्याय म्हणून सादर केलेल्या सामग्रीस ९ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले. याची माहिती जाणून घेऊया.


लाकडापासून बनवलेला सेल्युलोज प्लास्टिकसारखा प्लास्टिक कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी फिनलंडच्या व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटने सेल्युलोज रॅपर बनवले आहे. हे पारदर्शक प्लास्टिकसारखे आहे. हे लाकूड, तांदूळ किंवा उसाच्या चुइट्यांपासून बनवले जाते. प्लास्टिक पॅकेजिंगचा हा चांगला पर्याय होऊ शकतो.  


स्मॉग व हवेची प्रदूषित कणे शोषून घेते हे टाॅवर  
डच डिझायनर डॅन रुझगार्डे यांनी हे स्मॉग शोषून घेणारे टॉवर बनवले आहे. यास स्मॉग व्हॅक्यूम क्लीनरही म्हटले जाते. यामुळे प्रत्येक तासाला ३० हजार क्युबिक मीटर हवा स्वच्छ होते. याचे  सुधारित टॉवर पोलंडमध्ये लावले जात आहे. स्मॉग फ्री सायकल बनवण्यासाठी ४८ वर्षीय डॅनना डब्ल्यूइएफमध्ये यंग ग्लोबल लीडर सन्मानही दिला आहे.  


छोट्या वनाचे काम करणारा स्मार्ट ट्री, सौरऊर्जेवर चालते, पाण्याची गरज नाही
जर्मनची स्टार्टअप ग्रीन सिटी सोल्युशनने स्मार्ट ट्री तयार केला आहे. हे झाड छोट्या वनाचे काम करेल. हे झाड धूलिकण, २४० मेट्रिक टन नायट्रोजन डायऑक्साइड व कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. हे प्रमाण जवळपास ३०० झाडांएवढे आहे. झाडांच्या तुलनेत यास ९९% कमी जागा लागते. ते सौर ऊर्जेवर चालते. पाण्याची गरज स्वत:हून भागवते. २०१७ मध्ये त्यास प्रायोगिक तत्त्वावर नॉर्वे, फ्रान्स व हाँगकाँगमध्ये बसवले होते.  


खाद्यपदार्थ सुकवतो व त्यात प्रकाश जाऊ न देणारे साहित्य  
समुद्रातील प्रदूषण मोठी समस्या आहे. प्लास्टिक हे यामागचे मोठे कारण.३ ८०-१२० लाख टन कचरा जगभरातील समुद्रांत दरवर्षी टाकला जातो. अमेरिकेच्या पीट्सबर्ग विद्यापीठाच्या टीमने पुनर्प्रक्रिया होऊ शकणारी सामग्री बनवली आहे. हे रिसायकल न होणाऱ्या मल्टिलेयर पॅकेजिंगला बदलू शकतो तसेच खाण्याच्या वस्तूंनाही सुकवतो. त्यात प्रकाश जाऊ देत नाही व ओलसर होऊ देत नाही. सुपर मार्केटला हवी असणारी पॅकेजिंगची गरज हे पूर्ण करू शकते.  

बातम्या आणखी आहेत...