आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमधून भारतामध्ये नैसर्गिक वायूच्या आयातीस सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कच्च्या तेलानंतर आता भारत अमेरिकेतून नैसर्गिक गॅसची आयात करणार आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान वीस वर्षांसाठी करण्यात आलेल्या या करारानुसार “लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (एलएनजी) ची पहिली जहाजाची खेप लुइसियानामधून रवाना झाली आहे. या वेळी गेलचे सीएमडी बी. सी. त्रिपाठी आणि सेनिअर एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक फ्युस्को यांची प्रमुख उपस्थिती होती.  सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपनी गेल इंडियाने वार्षिक ३५ लाख टन  एलएनजीसाठी लुइसियाना येथील सेनिअर एनर्जीच्या प्रकल्पासोबत करार  केला आहे.  


गेलने दिलेल्या माहितीनुसार ही पहिली खेप २८ मार्चपर्यंत भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे जहाज महाराष्ट्रातील दाभोळ बंदरावर रिकामे केले जाणार आहे. भारताने मागील वर्षीच अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात करण्यास सुरुवात केली होती. या अंतर्गत आॅक्टोबर महिन्यात पहिली खेप आयात करण्यात आली होती. अमेरिकेने १९७५ पासून तेल निर्यातीवर बंदी घातली होती, जी २०१५ मध्ये माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी उठवली होती. 


गेलने डिसेंबर २०११ मध्ये अमेरिकेच्या एलएनजी निर्यात सेनिअर एनर्जीसोबत खरेदी-विक्रीशी संबंधित करार (एसपीए) केला होता. हा एसपीए एक मार्चपासून अमलात अाला आहे. या करारानुसार सेनिअर गेलला वर्षाकाठी ३५ लाख टन एलएनजीची विक्री आणि उपलब्धता करून देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...