आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत विकासात वाढत्या गुंतवणुकीमुळे वास्तुतज्ज्ञांसाठी नाेकऱ्यांच्या संधी वाढताहेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाभूत विकास व गृहविकासासाठी विविध योजना तयार करणे व त्यासाठी याेग्य डिझाइन बनवणे महत्त्वपूर्ण असते. बांधकाम व पायाभूत विकास क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीमुळे वास्तुतज्ज्ञांसाठी राेजगाराच्या संधी वाढत अाहेत.


आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग

वास्तुशास्त्राच्या शिक्षणात इमारतीचे प्लॅनिंग व डिझायनिंग करण्याचा अभ्यास केला जाताे. तसेच इतर बांधकामे जसे- रुग्णालये, उद्याेगांच्या वास्तू, घरे-बंगले, मल्टिप्लेक्स, शाळा, विमानतळे, मॉल्ससारख्या उंच इमारतींना एक याेग्य आकार दिला जाताे. यात व्यावसायिकांना सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून इमारतीचे डिझाइन तयार करावे लागते. हे काम करणाऱ्या व्यावसायिकांना वास्तुतज्ज्ञ म्हणतात. यांच्या प्रमुख कार्यक्षेत्रात क्षेत्र संशाेधन व पर्यवेक्षण, सुरक्षा व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, डिझायनिंग आदी कामांची जबाबदारी असते. 


कसा मिळेल प्रवेश?

वास्तुशास्त्रतज्ज्ञ बनण्यासाठी वास्तुशास्त्रातून पदवी वा डिप्लोमा करणे गरजेचे असते. विज्ञानाचा पूर्वेतिहास असलेले विद्यार्थी यात  करिअर करण्यास पात्र असतात. ५० % गुणांसह भाैतिक, रसायन व गणितातून बारावी करणारे विद्यार्थी वास्तुशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमास  प्रवेश घेऊ शकतात. यास ‘नाटा’च्या व्हॅलिड गुणांच्या अाधारे प्रवेश मिळताे. तथापि, काही संस्था स्वत:च्या प्रवेश चाचण्याही आयोजित करतात.

 

काेठे घ्याल शिक्षण?
> आयआयटी, रुरकी
https://www.iitr.ac.in/
> जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली
jmi.ac.in/ 
> एनआयटी, कालिकत
http://www.nitc.ac.in/
> एनआयटी, त्रिची
https://www.nitt.edu/
अावश्यक काैशल्ये :
> डिझायनिंग, चित्रकला-रेखाकला व संवाद काैशल्य.
>  व्यवस्थापनाचे काैशल्य. 
बातम्या आणखी आहेत...