आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Retreat Center, Veteran Technician Helps Students Get Out Of The Virtual World

अाभासी जगाबाहेर येण्यासाठी मदत करतेय हे रिट्रीट सेंटर, दिग्गज तंत्रज्ञही या केंद्राचे विद्यार्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- गेले वर्षभर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज वेगवेगळ्या मंचावर एकत्र येत तंत्रज्ञानाच्या वाईट परिणामांवर चर्चा करत आहेत. या व्यवसायापासून सिलिकॉन व्हॅलीही दूर नाही. तंत्रज्ञान जगतातील मोठ्या व्यक्तीही अाभासी जगातून सुटका करून घेण्यासाठी बिग सूर येथील इसालेन इन्स्टिट्यूटची मदत घेताहेत. 


हे ऐतिहासिक रिट्रिट सेंटर ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. कॅलिफोर्नियात भूस्खलन व पुरामुळे ते बंद करण्यात आले होते. २०१८ मध्ये याचे नवीन सत्र सुरू होत आहे. या सत्रात नवे तंत्रज्ञान, न्यूरोसायन्स व डिजिटल युगात सकारात्मक मानसिक स्थितीसारख्या बाबींवर लक्ष दिले जाईल. इसालेनचे कार्यकारी संचालक बेन टाउबर यांच्यानुसार, आपल्या पारंपरिक यशानेच जगाला चांगले बनवावे याची काही गरज नसल्याची जाणीव सिलिकॉन व्हॅलीतील लोकांना झाली आहे.  बॅन याआधी गुगलमध्ये होते. ते २०१५ पासून या कामाशी जोडले आहेत. त्यांनी सांगितले की, सत्राची सुरुवात नृत्य व ध्यान धारणेने होते. निवासाची व्यवस्था एखाद्या गावासारखी केली अाहे. सेंद्रीय शेतीच्या पिकातून बनवलेले जेवण दिले जाते. येथे कनेक्ट टू युवर इनर- नेट सत्र आहे. यामध्ये श्वास, ध्यान व योगाद्वारे  ताजेतवाने केले जाते. शिकागोतून आलेला ३१ वर्षीय सॅम मॅक्ब्राइड म्हणाला, मी माझे स्टार्टअप विकले आहे. आराम हवा होता म्हणून मी इथे आलो आहे.


गुगलमध्ये शेफ राहिलेल्या ४७ वर्षीय बोधी बालयजियान म्हणाले, सर्वांना आत्मा आहे. आम्हा तंत्रज्ञ दिग्गजांना याचा शोध घेण्यासाठी याची मदत होते.  बोधी येथे किचन सांभाळतात. फेसबुकमध्ये नोकरी केलेल्या डेव्ह माॅरिन नैराश्य व तंत्रज्ञानावर कोर्स करत आहेत.

 

१९६२ मध्ये हे सेंटरमध्ये सुरू, १.५ लाख रुपये आहे वीकेंडची फिस

एसेलेनच्या वीकेंड रिट्रिटची फिस ५५ हजार ते १.५० लाख रुपये आहे. एका सत्रात जवळपास १२० लोक असतात. १९६२ पासून सुरू झालेले हे केंद्र २७ एकरात विस्तारले आहे. गेल्यावर्षी पूर व भूस्खलनामुळे ते बंद करणे भाग पडले होते. येथे मोबाइल व वाय-फायची सुविधा नाही. तरीही अनेक टेक दिग्गज, चित्रपट निर्माते, आंत्रप्रेन्योर, कलाकारांनी विविध कार्यशाळेत भाग घेतलेला आहे. येथे आल्यानंतर सर्वांनी सकारात्मक बदल अनुभवला आहे.

बातम्या आणखी आहेत...