आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबीने कडक केलेेेे ‘स्विफ्ट’चे नियम, मेसेज सत्यापनासाठी स्वतंत्र विभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) ज्या ‘स्विफ्ट’ नेटवर्कचा दुरुपयोग करून ११,३९४ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता, त्या नेटवर्कचे नियम आता बँकेने अत्यंत कडक केले आहेत. ‘स्विफ्ट’वर आता केवळ अधिकारीच मेसेज तयार करु शकतील. लिपिकांना आता असे करण्याचा अधिकार नसेल. मेसेज तयार करणे, तो तपासणे आणि त्याचे सत्यापन करण्यासाठी आता तीन वेगवेगळे अधिकारी असतील. या आधी केवळ दोन अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी होती. यासंबंधी १७ फेब्रुवारी रोजीच बँकेने सर्व विभागीय कार्यालयाला आदेश पाठवले असून यावर गुरुवारपासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.  


पीएनबीने मुंबईमध्ये एक नवीन ट्रेझरी विभाग सुरु केला आहे. बँकेची शाखा ‘स्विफ्ट’च्या माध्यमातून जो मेसेज पाठवेल, तो पुन्हा सत्यापन करण्याची जबाबदारी या विभागावर असेल. येथे नियुक्त अधिकारी मेसेजला क्रॉस चेक करेल. मिसमॅचमुळे एखादा मेसेज रद्द करावा लागला तरी त्याची नोंद ठेवावी लागेल. ऑडिटिंग करताना त्याची तपासणी करण्यात येईल.  


‘स्विफ्ट’ आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य असलेले एक मेसेजिंग नेटवर्क आहे. याचा वापर केवळ बँका करतात. दोन वेगवेगळ्या बँकेदरम्यान व्यवहार होत असताना या माध्यमातून सूचना पाठवण्यात येते.


 मुंबईतील पीएनबीच्या ब्रेडी हाऊस शाखेतील उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी नीरव मोदी आणि मेहूल चौकशीला जे एलओयू जारी करत होता, त्याची सूचना तो ‘स्विफ्ट’च्या माध्यमातून दुसऱ्या बँकेला देत होता. मात्र, तो या व्यवहााची कोणतीच नोंद बँकेच्या सीबीएस प्रणालीमध्ये करत नव्हता.

बातम्या आणखी आहेत...