आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर निर्देशांक 35,511.58 वर; बाजारात 2012 नंतर सर्वाधिक दिवस तेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय शेअर बाजार निर्देशांक शुक्रवारी सलग सातव्या आठवड्यात ३५,५११.५८ या पातळीवर बंद झाला. २०१२ नंतर पहिल्यांदाच आलेल्या या तेजीच्या सात आठवड्यांत सेन्सेक्समध्ये ८.१ टक्क्यांची वाढ झाली. सर्वाधिक काळ तेजी २०१० मध्ये नोंदवण्यात आली होती. त्यादरम्यान निर्देशांकात सलग नऊ आठवडे तेजी नोंदवण्यात आली होती.


अशी राहिली तेजी  
- २५१ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ३५,५५१२ या पातळीवर बंद
- ७८ अंकांच्या वाढीसह निफ्टी १०,८९५ या पातळीवर बंद.    
- १०,९००  या पातळीपर्यंत मजल मारली निफ्टीने पहिल्यांदाच. 


तेजीची कारणे
- जीएसटी परिषदेने वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला.   
- कर कमी झाल्याने गुंतवणूकदारांची धारणा सकारात्मक झाली.