आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाच्या पिठात प्लास्टिक नाही, ग्लुटेन प्रोटीनमुळे प्लास्टिकसारखे ताणले जाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोशल मीडियावर सध्या गव्हाच्या पिठाशी संबंधित बातम्या येत आहेत. काही व्हिडिओमध्ये पीठ मळल्यावर ते प्लास्टिकसारखे ताणले जात असल्याचे सांगितले. ग्राहकांच्या तक्रारीनंतर दिल्लीसह अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले व तपासणीसाठी पिठाचे नमुने घेण्यात आले. ज्या ब्रँड्सबाबत लोक तक्रारी करत आहेत, त्यात आशीर्वाद व शक्तिभोग प्रमुख आहेत. 

 
तज्ज्ञ व कंपन्यांनी या तक्रारी निराधार ठरवल्या आहेत. आशीर्वाद ब्रँडचे पीठ तयार करणारी कंपनी आयटीसीचे फूड बिझनेस प्रमुख हेमंत मलिक यांनी सांगितले की, गव्हात नैसर्गिकरीत्या ग्लुटेन नावाचे प्रोटीन असते. अन्न नियामक एफएसएसएआयचा नियम अाहे की, किमान ६% असणे आवश्यक आहे. मायक्रोकेम सिलिकरच्या डिसेंबरच्या एका प्रयोगशाळेचा अहवालात म्हटले की, आशीर्वाद पिठात १०.४%, पिल्सबरीमध्ये ९%, सिल्व्हम कॉइनमध्ये ९.७% व पतंजली पिठात १०.३% ग्लुटेन आहे. भारतीय गहू व जव संशोधन संस्थेचे माजी संचालक जे. पी. टंडन यांनी संबंधित वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, पिठात पाणी मिसळल्यावर ग्लुटेनमुळे पीठ वळणी येते व आपण चपाती बनवतो. चांगल्या प्रतीच्या पिठात ८-१०% ग्लुटेन असते. पिठात ग्लुटेन नसेल तर गहू खराब अाहे, असा त्याचा अर्थ होतो.  हेमंत यांनी सांगितले की, पिठात प्लास्टिकची भेसळ होत असल्याचे म्हणणे अजब आहे. कारण पीठ २५-३० रुपये किलोने विकते आणि प्लास्टिकचा भाव १०० रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

चांगल्या दर्जाच्या पिठात ८-१० टक्के ग्लुटेन

- चांगल्या दर्जाच्या पिठात ८ ते १० टक्क्यांपर्यंत ग्लुटेन असते.
- पाणी मिसळल्यानंतर ग्लुटेनमुळे पिठाचा गोळा तयार होतो.
- प्लास्टिक १०० रु.किलो, त्यामुळे पिठात त्याची भेसळ निरर्थक आहे.

बातम्या आणखी आहेत...