आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियोमध्ये बसून जगभरातील पर्यटन ठिकाणे फिरण्याचा अानंद घेतील पर्यटक, 2 तासांचे 4 रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- जपानच्या फर्स्ट एअरलाइन्सने व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) टूर सुरू केला आहे. यामुळे टोकियोमध्ये बसल्या बसल्याच पर्यटक पॅरिस, न्यूयॉर्क, लंडनसह जगभरातील मोठ्या पर्यटन ठिकाणी फिरता येईल. त्यासाठी विमानाची किंवा पासपोर्टचीही गरज नाही. पर्यटकांना केवळ कंपनीच्या कार्यालयात जावे लागेल. तोशिमा शहरातील बिझनेस अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर या कार्यालयात विमानाप्रमाणेच फर्स्ट क्लास सीट, व्हीआर हेडसेट आणि एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. स्क्रीन आणि व्हर्च्युअल विंडो वरच पर्यटनाच्या ठिकाणचे व्हिडिओ दिसतात. दोन तासांच्या या व्हर्च्युअल टूरसाठी सुमारे चार हजार रुपये द्यावे लागतात.

 

 

बातम्या आणखी आहेत...