आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगार तरुणांना रेल्वे तिकिटावर मिळते 100% पर्यंतची सूट, डॉक्‍टरही घेऊ शकतात 10% डिस्‍काऊंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - रेल्वेने प्रवास करताना फक्त ज्येष्ठ आणि दिव्यांग यांनाच रेल्वे तिकिटात सूट मिळते असे नाही. या कॅटेगरीत 13  प्रकारच्या प्रवाशांना सूट मिळते. त्यात रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह डॉक्टर आणि बेरोजगारांचाही समावेश असतो. 


भारतीय रेल्वेत या सर्वांना स्वस्तात प्रवास करणे शक्य आहे. त्यानुसार डॉक्‍टरांना रेल्वे तिकिटावर 10 टक्के तर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 50 ते 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. त्याशिवाय नर्स आणि मिडवाइफ यांनाही 25 टक्के स्वस्त तिकिट दिले जाते. भारतीय रेल्वेमध्ये यांना कशासाठी स्वस्त प्रवास करता येतो हे जाणून घेऊयात. 


बेरोजगार तरुण 
- घटनात्मक मंडळे(स्‍टॅच्‍युटोरी बॉडी), म्‍युनिसिपल कॉर्पोरेशन, गव्हर्नर्मेंट अंडरटेकिंग, युनि‍व्हर्सिटी किंवा पब्लिक सेक्टर बॉडीच्या नोकरीसाठी मुलाखतीला जाणाऱ्या बेरोजगार तरुणांना रेल्वेकडून तिकिटात 50 टक्के सूट दिली जाते. ही सूट सेकंड क्लास आणि स्लीपर क्लासच्या प्रवासासाठी असते. 
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकरींसाठी मुलाखत देणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्लीपर क्लासच्या तिकिटात 50  टक्के आणि सेकंड क्लासच्या तिकिटात 100 टक्क्यापर्यंत सूट मिळते. 


या तरुणांनाही 50% पर्यंत सूट 
नॅशनल यूथ प्रोजेक्‍टच्या नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी जाणआऱ्या तरुणांसाठी सेकंड आणि स्लीपर क्लाच्या तिकिटावर 50 टक्के सूट असते. 
 

पुढे वाचा, डॉक्टर नर्सना किती मिळते सूट.. 
 
 

बातम्या आणखी आहेत...