आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे केस कापण्यासाठी द्यावी लागताहेत केळी आणि अंडी, जगण्यासाठी सुरू आहे बलुतेदार पद्धत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखाद्या देशात आजघडीला बलुतेदार पद्धत म्हणजे देवाण घेवाण सुरू असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. पण व्हेनेझुएला देशाची अवस्था सध्या अशीच झाली आहे. याठिकाणी केस कापण्यासाठी लोक पैसे नव्हे तर अंडी किंवा केळी मागत आहेत. येथील महागाई भारताच्या तुलनेत 5 हजार पटीने जास्त आहे. यावरूनच तुम्हाला येथील स्थितीचा अंदाज येईल. मे 2018 मध्ये व्हेनेझुएलाचा महागाईचा दर 25000 टक्के नोंदवण्यात आला होता. भारतात हा दर 4.87 टक्के आहे. 

 
अशी आहे स्थिती 
मीडिया रिपोर्ट्सनुसार येथे घर काम करणारे, कॅब ड्रायव्हर, कारपेंटर, नर्स, रिटेलर्स किंवा प्रोफेशनल्सदेखिल वस्तू किंवा सेवांच्या मोबदल्यात अन्नाची मागणी करत आहेत. कारण संपूर्ण देशात तीव्र मंदी आहे. या आर्थिक स्थितीमुळे 2015 ते 2017 दरम्यान देशातील लोकसंख्येच्या एकूण 3 टक्के लोकांना देश सोडून जावे लागले आहे. पैसा नसल्याने लोक गरजा पूर्ण करण्यासाठी देवाण घेवाण पद्धतीचा वापर करत आहेत. 

 
यामुळे उद्भवली स्थिती 
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या कार्यकाळात देशात कायम आर्थिक संकट राहिले आहे. यंदा मे महिन्यात पुन्हा मादुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती बनले. अमेरिका आणि इतर देशांनी या निवडीचा विरोधही केला. देशात खाद्य पदार्थांबरोबरच औषधांचीही कमतरता आङे. त्याचबरोबर अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या ट्रेड वॉरसारख्या परिस्थितीमुळे व्हेनेझुएलाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...