आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांत तुम्ही करू शकता 12 लाखांची सेव्हींग, असे आहे गुंतवणुकीचे गणित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 6 वर्षांचा काळ फार नसतो. जर तुम्हाला कमी काळामध्ये ठरावीक रक्कम जमा करायची असेल तर तुम्ही तसे आरामात करू शकता. जर तुम्हाला 6 वर्षांत 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक पैसा जमा करायचा असेल तर ही एक चांगली आयडिया आहे. हा पैसा तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्यासाठी वापरू शकता. हा पैसा तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवूदेखिल शकता. 


कुठे कराल गुंतवणूक.. 
पैसाबाजार डॉट कॉमचे डायरेक्टर आणि म्युच्युअल फंडचे मनीष कोठरी म्हणाले की, तुम्हाला 6 वर्षांत 10 लाख किंवा अधिक पैसे जमवायचे असतील तर तुम्हाला अशा ठिकाणी गुंतणूक करावी लागेल ज्याठिकाणी कमी जोखीम आणि पीपीएफ किंवा बँक एफडीच्या तुलनेत अधिक रिटर्न मिळेल. इक्विटीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही अधिक रिटर्न मिळवू शकता. पण प्रत्येकाला शेअर आणि स्टॉकमध्ये किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करणे सोपे किंवा योग्य वाटत नाही. अशावेळी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. एसआयपीद्वारे यात गुंतणूक करता येते. 

 

12 लाखांसाठी महिन्याला एवढे गुंतवा 

मनीष कोठारी यांच्या मते, तुम्हाला एसआयपीमध्ये दरमहिन्याला 10 हजारांची गुंतवणूक करत दरवर्षी त्यात 1 हजारांची वाढ करावी लागेल. जर 12 टक्क्यांनी रिटर्न मिळाले तर सहा वर्षांत तुमची रक्कम 12,85,452 एवढी होईल. या तक्त्यावरून तुम्हाला ते सहज लक्षात येईल. 

 

कार किंवा घर खरेदीसाठी करा वापर 
तुम्ही गुंतवलेल्या पैशाचा वापर कार किंवा घर खरेदीसाठी करू शकता. 12 लाखांत घर खरेदी शक्य नसली तरी या पैशाची तुम्हाला मदत होईल. त्याशिवाय हा पैसा दीर्घ काळासाठी गुंतवताही येऊ शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...