आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAN बाबत टाळाटाळ पडेल महागात, दंडाबरोबर दाखल होऊ शकतो गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल आणि त्याने PAN (परमनंट अकाऊंट नंबर) घेतलेला नसेल तर ते आता फार काळ सरकारला फसवू शकणार नाहीत. लोक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याने त्यांच्याकडे पॅन नसल्याचे सांगतात. त्याआधारे बँक त्यांच्याकडून फॉर्म 60 घेते. अशाच प्रकारे ते बँकेशिवाय इतर ठिकाणीही व्यवहार करतात. अनेक लोक विविध बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये तीन-चार एफडी ठेवतात. पण सरकारला याबाबत समजत नाही. पण सरकारने अशा लोकांबाबत योग्य माहिती गोळा करण्याचा मार्ग शोधला आहे.

 
फॉर्म 60 भरताना राहा अलर्ट 
जर तुमच्यासडे परमनंट अकाऊंट नंबर नसेल आणि तुम्हाला पॅन गरजेचे असेल असे एखादे ट्रान्झेक्शन करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म 60 भरून तसे करावे लागते. पण जर एका आर्थिक वर्षामध्ये तुम्ही फॉर्म 60 द्वारे एकापेक्षा जास्त ट्रान्झेक्शन केले तर तुमची सर्व माहिती सरकारकडे जाते. फॉर्म 60 ही सुविधा अशा लोकांसाठी आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त रकमेपेक्षा म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. जर तुमचे उत्पन्न यापेक्षा अधिक असेल आणि तुम्ही फॉर्म 60 भरला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. इनकमटॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला यासाठी नोटीस पाठवू शकते. जर चौकशीत तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म 60 भरून करचोरी करत असल्याचे लक्षात आले तर तुमच्या विरोधात खटला दाखल केला जाऊ शकतो. 


सरकारकडे जमा होईल व्यवहारांची माहिती 
चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) संगीत गुप्ता यांनी सांगितले की, इनकमटॅक्स डिपार्टमेंटच्या अधिसूचनेनुसार जर पॅन नसलेल्या एखाद्या व्यक्तीला पॅन गरजेचे असेल असा व्यवहार करायचा असेल तर त्याला फॉर्म 60 भरावा लागेल. त्यात त्याला व्यवहाराची माहितीही द्यावी लागेल. एकाच व्यक्तीने एका आर्थिक वर्षात एकापेक्षा अधिक वेळा फॉर्म 60 द्वारे व्यवहार केला तर सरकारकडे त्याबाबत संपूर्ण माहिती जमा होते. 


पोर्टलद्वारेही भरता येतो फॉर्म 60, वाचा पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...