आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीआयने अनुचित व्यापार व्यवहारासाठी गुगलला लावला 136 कोटींचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआय)ने अनुचित व्यापार व्यवहारासाठी प्रमुख इंटरनेट कंपनी गुगलला १३५.८६ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. प्रतिस्पर्धा नियामकाने कंपनीला ऑनलाइन सर्व आणि जाहिरात बाजारातील मजबूत स्थितीचा दुरुपयोग करणे आणि बाजारातील प्रतिस्पर्धा थांबवण्याच्या गतिविधींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवले आहे.  


मॅट्रिमोनी डॉट कॉम आणि कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी (कट्स) च्या वतीने २०१२ गुगल एलएलसी, गुगल इंडिया प्रा. लि. आणि गुगल आयर्लंडच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रकरणात निकाल देताना सीसीआयने हा दंड लावला आहे. सीसीआयच्या आदेशानुसार, दंडाची रक्कम १३५.८६ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०१३, १४ आणि १५ मध्ये भारतातील कंपन्यांच्या वतीने कमावलेल्या सरासरी महसूलच्या पाच टक्के आहे. विशेष म्हणजे तपासात सहयोग करत नसल्यानेच मागील वर्षी गुगलवर एक कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला होता. जागतिक पातळीवर गुगलवर लावण्यात आलेल्या मोजक्या दंडामध्ये या निर्णयाचा समावेश आहे. गुगलच्या विरोधात अनेक देशांमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...