आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार 5 वर्षांत 50 लाख लोकांना देणार नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- सरकारच्या वतीने पुढील पाच वर्षांत ५० लाख आयटी तज्ज्ञांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘फ्यूचर स्किल्स’ प्लॅटफॉर्म लाँच केले. याला दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी उद्योग संस्था नॅसकॉमच्या मदतीने तयार केले आहे. 


नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी कमी होणार नाहीत, यावर या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन काेर्स करता येतील. सुरुवातीला यावर २० लाख आयटी तज्ज्ञांना नवीन तंत्रज्ञानाबाबतची माहिती देण्यात येणार आहे, तर दुसरीकडे इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या क्षेत्रातील निर्यात सध्या ९.६३ लाख कोटी रुपयांची आहे. ती २०२५ पर्यंत ही निर्यात दुपटीने वाढवून २२.४७ लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...