आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बटाटा, गाजर स्वस्त; भेंडी, वांगी, कोथिंबिर महागली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची जादा आवक सुरू असल्याने सलग तिसऱ्या आठवड्यात दर गडगडलेले आहेत. बहुतांशी फळभाज्या १० ते १५ रुपये किलो तर पालेभाज्या २ ते ५ रुपये जुडी मिळत अाहे. होलसेलमध्ये माल स्वस्त मिळाल्याने किरकोळ दुकानांतही भाज्यांचे दर उतरले आहेत. यामुळे एकीकडे ग्राहक वर्ग खुश आहे, तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया आहे.  


गेल्या आठवड्यात ९०० क्विंटल बटाट्याची आवक झाली असल्याने त्यास ९०० रुपये दर मिळाला. आज १० फेब्रुवारी रोजी मात्र ३०० क्विंटल बटाटा ७०० रुपयांनी विकला गेला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याच्या दरात २०० रुपयांची घट झाली. कांद्याचे दरही घसरले असून आज  बाजारात यास १५०० रुपयांचा दर मिळाला. गाजराचे दर २०० रुपयांनी घसरून ९०० रुपयांवर आले. तर शेवग्याच्या दरातही थोडी घसरण होऊन हे दर ३२५० वर आलेत. फ्लाॅवरच्या दरातही ५० रुपयांची घसरण होऊन ७५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. बाजारात कोबीची आवक सुरूच असून याचे दर सातत्याने घसरत आहेत. गेल्या आठवड्यात २१० क्विंटल कोबीची आवक झाली हाेती. आज बाजारात ४०० क्विंटल कोबीची आवक झाली. त्यास ४०० रुपये क्विंटल दर मिळाला.  तर पालकाचे दर १४५ रुपयांवरून १२५ रुपयांवर घसरले.   

 

भेंडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ
गेल्या आठवड्यात  १५०० रुपये क्विंटलने विकला गेलेला वाटाणा आज १७५० रुपयांवर पोहोचला. बाजारात १२७ क्विंटलची वाटाण्याची आवक झाली. भेंडीच्या दरातही ८०० रुपयांची वाढ होऊन ३१०० रुपयांचा दर मिळाला. वांग्याचे दर स्थिर असून ७५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. कोथिंबिरीचे दर १५० रुपयांवरून ३५० रुपयांवर  झाले आहेत. हिरव्या मिरचीची आवक आणि दर दोन्ही स्थिर आहेत. आज बाजारात ४० क्विंटल हिरवी मिरची दाखल झाली. त्यास ४२५० रुपयांचा दर मिळाला.

बातम्या आणखी आहेत...