आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा अन् भविष्यकालीन संकल्पनांवर आधारित 80 गाड्यांचे सादरीकरण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- दिल्ली ऑटो एक्स्पो-२०१८ च्या १४ व्या प्रदर्शनाला बुधवारी ग्रेटर नोएडामध्ये सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कंपन्यांनी हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित करत मॉडेल लाँच केले. त्याचबरोबर कंपन्यांचे लक्ष पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होण्याबरोबरच सुरक्षेवरही आहे. दक्षिण कोरियाई कंपनी ‘किया’ ने थ्री प्लग-इन हायब्रीड कारसह ऑटो एक्स्पोमध्ये एकूण १६ जागतिक मॉडेल लाँच केले. 

 
२२ प्रदर्शकांच्या गाड्या आल्या रॅम्पवर  
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २२ प्रदर्शकांनी सुमारे ८० गाड्या लाँच केल्या. हुंदाईने आयनिक लाँच करत ही जगातील पहिली हायब्रीड, प्लग-इन हायब्रीड आणि ऑल इलेक्ट्रिक तीनही तंत्रज्ञान असलेली कार असल्याचा दावा केला. मर्सिडीझ, मारुती आणि महिंद्रानेदेखील इलेक्ट्रिक आणि हायब्रीडवर लक्ष केंद्रित केले.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आकर्षक गाड्या आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...