आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दूरसंचार नियामक ट्राय नाशिकमधील सर्व मोबाइल अॉपरेटरांची आवाज आणि डेटा सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी फेब्रुवारीच्या मध्यापासून मोहीम राबवणार आहे. यात नियमानुसार आवाजाची आणि डेटा सेवेची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. याला इन्डिपेंडंट ड्राइव्ह टेस्ट्स (आयडीटी) असे नाव देण्यात आले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील गाझियाबाद, नोएडा, गुडगाव आणि फरिदाबादमध्ये हे अभियान १८ दिवस चालू राहणार असून मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण होणार आहे. याअंतर्गत सर्व सेवा प्रदात्यांच्या दूरसंचार सेवेची तपासणी करण्यात येणार आहे.
ट्रायच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ट्राय नियमित अशा पद्धतीने सेवेची गुणवत्ता निश्चित मानकांप्रमाणे आहे का, याची तपासणी करते. नियामक जुलै २०१७ ते जून २०१८ दरम्यान देशातील ७० शहरांत अशा पद्धतीने अभियान चालवणार आहे. यात १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा सर्वाधिक समावेश आहे. आतापर्यंत हे अभियान ३३ शहरात राबवण्यात आले आहे. १६ शहरांसाठी आयडीटी अहवालदेखील जारी करण्यात आला असून इतर १७ शहरातील अहवाल लवकरच जाहीर होईल. ज्या शहरात पुढील काळात हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यामध्ये नाशिक, जयपूर, कोटा, भोपाळ, ग्वाल्हेर, आग्रा, मेरठ, हिसार, चंदिगड, लुधियाना, अहमदाबाद, मदुराई आणि कोचीसह इतर शहरांचा समावेश आहे. यात ७० शहरांव्यतिरिक्त नियामक राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गावरील सेवेचीही तपासणी करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.