आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहरा ओळखून दरवाजा उघडणारी कार, घडी होणारी स्कूटर; पाहा अफलातून Gadgets...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास- दररोजच्या जीवनात उपयोगी ठरतील अशीच उत्पादने जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कंपन्यांनी सादर केली. या प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चालकरहित कारपासून ते आरोग्यविषयक गॅजेट सादर करण्यात आले. मुले तसेच ज्येष्ठांसाठी ग्राहकोपयोगी गॅजेट्सही सादर करण्यात आले. याव्यतिरिक्त शॉर्ट स्टोरी डिस्पेन्सरसारखे कल्पक गॅजेट आणि रोबोट्सचे नवे तंत्रज्ञानही पाहायला मिळाले.  

 

ऑटोमोबाइल्स ; इशाऱ्यानेच करता येईल ड्रायव्हिंग  

चिनी कंपनी बाइटनची इलेक्ट्रिक कार चेहरा ओळखून आपोआपच अनलॉक होईल. स्टेअरिंगवर टचस्क्रीन असलेली ही जगातील पहिलीच कार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आवाज आणि जेस्चर कंट्रोल सुविधा असल्याने इशाऱ्याने ही कार चालवता येईल.  

 

- एकदा चार्जिंगमध्ये ५२३ किमी चालेल. अर्ध्या तासात होईल चार्ज.  
- दरवाजात अदृश्य हँडल लावले आहेत. साइड व्ह्यूसाठी कॅमेरा.  
- डॅशबोर्ड टचस्क्रीन डिस्प्ले आरोग्यावरही लक्ष ठेवेल.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आण‍खी गॅजेट...

बातम्या आणखी आहेत...