आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्टून चॅनलवरील जंक फूडच्या जाहिराती बंद; कंपन्यांनीच घेतला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  कार्टून चॅनल्सवरील जंकफूडच्या जाहिराती न दाखवण्याच निर्णय जंकफूड कंपन्यांनीच घेतला आहे. दरम्यान, टीव्हीवरील जंकफूडच्या जाहिराती बंद करण्याची सरकारची सध्या कोणतीही योजना नसल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले.


माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड म्हणाले, फूड अँड बेव्हरेज अलायन्स ऑफ इंडियासारख्या संस्थांनी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले की, कोल्ड किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातींवर बंदीचा प्रस्ताव नाही. मात्र, नऊ मोठ्या फूड कंपन्यांनी लहान मुलांसाठी असलेल्या चॅनल्सवर अशा खाद्यपदार्थांच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत, असा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...