आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 हजार मेगावॅटचे पावर प्लांट ठप्प, 26 थर्मल यूनिटमध्ये कोळसा नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : विजेची मागणी वाढल्यामुळे अनेक राज्यांमध्ये वीज संकट उभे राहिलेय. जवळपास 52 हजार मेगावॅट कॅपेसिटीचे पावर प्लांट ठप्प आहेत. यामध्ये 26 थर्मल यूनिटमध्ये कोळसा नसल्यामुळे वीज निर्माण होऊ शकत नाहीये. याच कारणांमुळे देशभरात जवळपास 12 टक्के पावर शॉर्टेज निर्माण झाली आहे. सर्वात जास्त शॉर्टेज उत्तर भारतात होत आहे. यामुळे इंडस्ट्री, विशेषतः एमएसएमई सेक्टरमध्ये प्रोडक्शनवर परिणाम होतोय.


किती शॉर्टेज होतेय
नॅशनल लोड डिस्पेच सेंटरच्या रिपोर्टनुसार 18 फेब्रवारीला 155050 मेगावॅट इतक्या वीजेचा सप्लाय झाला. तर पीक शॉर्टेज जवळपास 782 मेगावॅट होती. मिलियन यूनिटनुसार जवळपास 12.1 टक्के शॉर्टेज रेकॉर्ड करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सामान्य दिवसांमध्ये 3 ते 4 टक्के पावर शॉर्टेज होते.

 

कुठे आहे शॉर्टेज
एनएलडीसीनुसार सर्वात जास्त पावर शॉर्टेज उत्तर भारतात होत आहे. येथे जवळपास 11.5 टक्के पावर शॉर्टेज रेकॉर्ड केली गेली. येथील पावर डिमांड ही जवळपास 51738 मेगावॅट होती आणि पीक अव्हरमध्ये जवळपास 704 मेगावॅट वीज कापण्यात आली.

 

कोणत्या राज्यांना समस्या
उत्तर प्रदेश : 290 मेगावॅट
हरियाणा : 19 मेगावॅट
राजस्थान : 165 मेगावॅट
जम्मू काश्मीर : 521 मेगावॅट

 

काय आहे कारण 
कोळशाच्या कमतरतेमुळे कोळस्यावर चालणारे थर्मल प्लांट ठप्प झाले आहेक. तर गॅसवर चालणारे पावर प्लांट्सचे 22 यूनिट गॅसच्या कमतरतेमुळे बंद पडले आहेत. रिपोर्ट्सनुसार 36113 मेगावॅट कॅपेसिटीचे पावर प्लांट्स फोर्स मेंटेनेंसमुळे बंद आहेत. तर 16125 मेगावॅट कॅपेसिटीचे पावर प्लांट्स फोर्स मेंटेन्समुळे बंद आहेत. म्हणजेच एकुण 52238 मेगावॅटचे पावर प्लांट फोर्स मेंटेनेंसमुळे बंद आहेत. तर 6029 मेगावॅट पावर प्लांट्स मेंटेनेंसमुळे बंद आहेत. याच प्रकारे इतर कारणांमुळे 9304 मेगावॅट कॅपेसिटीचे पावर प्लांट बंद आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...