आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक म्हणजे एसबीआयने त्यांच्या जवळपास 17 कोटी डेबीट कार्ड होल्डर्सना इशारा दिला आहे. एसबीआयने डेबीट कार्ड होल्डर्सना म्हटले आहे की, तुमच्या आईचे आडनाव कोणालाही सांगू नका. त्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण पासवर्ड रिसेट करत असतो, तेव्हा सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये आईचे आडनाव किंवा तुमचे टोपण नाव म्हणजे ज्या नावाने तुम्हाला घरी बोलावतात ते विचारले जाते. त्यामुळे ही नावे कोणाबरोबर शेअर करू नका. तसे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. हॅकर्स त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधून चोरी करू शकतात.
इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बनवा अधिक मजबूत
एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर, रिस्क आयटी अँड सबसिडियरीजचे दिनेश खारा यांच्या मते तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर यूझर आयडी पासवर्ड शेअर करू नका. तो नेहमी गोपनीय ठेवा. नेहमी अत्यंत स्ट्राँग पासवर्ड तयार करा. लोक शक्यतो लक्षात राहावा म्हणून सोपा पासवर्ड तयार करतात. पण त्यामुळे अकाऊंट हॅक करण्याचा धोका वाढतो. कारण सायबर क्राइम करणारे असे पासवर्ड सहज हॅक करतात. पासवर्ड वेळोवेळी बदलणेही गरजेचे असते.
आयटीचा सेफ वापर गरजेचा
आपण रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना सुरक्षितपणे त्याचा वापर करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे आयटीचा वापरही सुरक्षितपणे करणे गरजेचे असते. त्यातूनच सायबर क्राइमपासून आपण वाचू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.