आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईपीएफओची आज बैठक, 8.65% व्याजाची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) च्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक होणार आहे. चालू आर्थिक वर्षात जमा झालेल्या पीएफच्या रकमेवर व्याजदर निश्चित करण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय होणार आहे. ईपीएफओच्या सुमारे पाच कोटी भागधारकांसाठी पीएफच्या जमा रकमेवर ८.६५ टक्के व्याज कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. ईपीएफओने २०१६-१७ मध्येदेखील पीएफ जमावर ८.६५ टक्के व्याज दिले होते, तर २०१५-१६ या वर्षात ८.८ टक्के व्याज दिले होते.  


चालू आर्थिक वर्षात हे दर कायम ठेवण्यासाठी ईपीएफओने याच महिन्याच्या सुरुवातीला २,८८६ कोटी रुपये मूल्याचे “एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ म्हणजेच ईटीएफची विक्री केली आहे. या माध्यमातून ईपीएफओला १,०५४ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


चालू आर्थिक वर्षासाठी खातेधारकांना द्यायच्या ८.६५ टक्के व्याजासाठी ही रक्कम पुरेशी आहे. ईपीएफओ ऑगस्ट २०१५ पासून ईटीएफमध्ये गुंतवणूक करत असून आतापर्यंत ईटीएफ विक्री करण्यात आलेले नाही. ईपीएफओने ईटीएफमध्ये आतापर्यंत एकूण ४४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...