आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांसाठी 'टॉनिक' तयार करून महिन्याला 50 हजारांची कमाई करतात हरिदास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्याप्रमाणे माणसाला पोषक तत्वांची गरज असते तशीच रोपांना किंवा झाडांनाही वाढण्यासाठी पोषक तत्वे गरजेची असतात. ठरावीक वेळेत अशी पोषक तत्वे मिळाली नाही तर रोपे जळून जाण्याची शक्यता असते. शेतकरी म्हणून या समस्येचा सामना करणाऱ्या हरिदास कुंभार यांनी झाडांसाठी एक टॉनिक तयार करायचे ठरवले. नंतर अनेक वर्षांच्या संशोधनानंतर प्लान्ट ग्रोथ रेग्युलेटर्स (PGR) तयार करण्यात त्यांना यश आले. त्यासाठी त्यांनी सरकारच्या अॅग्री अँड बिझनेस सेंटरमधून ट्रेनिंग घेतले आणि अवघ्या 1 लाखांची गुंतवणूक करून सध्या चांगली कमाई करत आहेत. 

 
अशी सुचली कल्पना 
महाराष्ट्रातील सांगलीचे रहिवासी असलेल्या हरिदास कुंभार यांनी सांगितले की, ते स्वतः अंगुराची शेती करतात. पण प्रचंड मेहनत करूनही त्यांना योग्य तेसे उत्पादन मिळत नव्हते. वेळेवर खत, पाणी देऊनही झाडांची वाढ योग्य प्रमाणात होत नव्हती. तसेच फळेही चांगली लागत नव्हती. दर्जाही फार चांगला नव्हता. त्यामुळे त्यांनी काही संशोधन केले आणि मग त्यांना टॉनिक तयार करण्याची कल्पना सुचली. 

 
अॅग्री बिझनेस सेंटरमधून घेतले ट्रेनिंग 
झाडांसाठी पीजीआर तयार करण्यासाठी हरिदास यांनी सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अॅग्री क्लिनिक अँड अॅग्री बिजनेस सेंटर्समध्ये ट्रेनिंग घेतले. त्याठिकाणी त्यांनी विविध झाडांच्या वाढीसाठी गरजेच्या पोषक तत्वांबाबत माहिती मिळवली. त्यांना समजले की, माणसांप्रमाणे झाडांनाही वाढ होण्यासाठी प्रजनन आणि इतर बाबींसाठी पोषक तत्वांची गरज असते. ते मिळाले तरच वाढ चांगली होऊन फळे भरपूर लागतात. 

 
1 लाखापासून सुरुवात 
ट्रेनिंग घेतल्यानंतर हरिदासने प्लान्ट ग्रोथ रेग्युलेटर्स तयार करण्याच्या प्रोजेक्टवर काम सुरू केले. स्वतःच्या जमिनीवर 1 लाख रुपये खर्चून प्लान्ट लावला. त्यानंतर मल्टीअॅक्सेल नावाने पीजीआर तयार करण्याचे काम सुरू केले. त्यांचे म्हणणे आहे की, बाजारात त्यांच्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या दगोन जिल्ह्यांत 1500 हून जास्त शेतकऱ्यांनी या प्रोडक्टचा वापर केला. याच्या वापराने उत्पादनात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

 
वर्षाला 6 लाख कमाई  
हरिदास प्लान्ट ग्रोथ रेग्युलेटर्स तयार करून वर्षाला 6 लाखांपर्यंत कमाई करत आहेत. त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख आहे. त्यांनी सांगितले की, खर्च जाऊन त्यांना 30 टक्के नफा मिळतो. सध्या त्यांचे हे प्रोडक्ट सांगलीच्या आसपासच्या जिल्ह्यांतच विकले जाते. मोठ्या प्रोजेक्टसाठी जास्त गुंतवणूक लागणार असल्याने सध्या बिझनेस वाढवण्याचा त्यांचा विचार नाही. 

बातम्या आणखी आहेत...