आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव घोटाळा : फिच-मुडीजने कमी केले पीएनबीचे मानांकन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था “मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस’ अाणि “फिच रेटिंग’ने नीरव मोदी घोटाळा समोर आल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) मानांकन कमी करण्याबाबत सूचित केले आहे. दोन्ही संस्थांनी देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पीएनबीचे नेटवर्थ कमी झाल्याने तसेच नुकसान वाढल्यामुळे मानांकन कमी झाले असल्याचे म्हटले आहे. ११,३४४ कोटी रुपयांचा हा घोटाळा देशाच्या बँकिंग इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात माेठा घोटाळा असल्याचे या दोन्ही संस्थांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपर्यंत हा घोटाळा पकडला गेला नसल्याने बँकेच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचेही म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...