आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉक्सवॅगनच्या माजी जीएमला अमेरिकी कोर्टाने दिली 7 वर्षांची शिक्षा, 2.6 कोटी रुपयांचा दंडही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेट्रॉयट- अमेरिकी न्यायालयाने फॉक्सवॅगनच्या माजी अधिकाऱ्यास सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ऑलिव्हर श्मिट यांना अमेरिकेत कंपनीच्या ६ लाख गाड्यांच्या प्रदूषण चाचणीत चकवा दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले. चकवा देण्यासाठी श्मिट यांनी सॉफ्टवेअरचा वापर केला होता. श्मिट यांना २.६ कोटी रुपयांचा दंडही भरावा लागेल.  


मूळ जर्मनीचे असलेले ४८ वर्षीय श्मिट कंपनीमध्ये मिशिगन कार्यालयात एन्व्हायर्नमेंटल अँड इंजिनिअरिंगमध्ये महाव्यवस्थापक होते. कंपनीने या प्रकरणात आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा युक्तिवाद श्मिट यांनी केला होता. मात्र, डेट्रायटचे न्यायाधीश सीन कॉक्स यांनी याला तुम्ही उद्योग जगतातील उंची प्राप्त करण्यासाठी संधीच्या रूपात पाहिल्याचे सांगितले.

 

अमेरिकेला धोका देणाऱ्या या प्रकरणात तुम्ही प्रमुख कारस्थानी आहात. श्मिट यांनी न्यायालयात आरोप मान्य करत लेखी निवेदन वाचून दाखवले. त्यात श्मिट यांनी त्यांना चुकीचे निर्णय घेतल्याचे मान्य केले. यासाठी त्यांनी माफीही मागितली. फॉक्सवॅगनने सप्टेंबर २०१५ मध्ये प्रथमच वाहन उत्सर्जन (इमिशन) चाचणी टाळण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केल्याची कबुली दिली होती. हा घोटाळा जवळपास १.९ लाख कोटींचा होता. २०१२ ते २०१५ च्या सुरुवातीपर्यंत इमिशनच्या देखरेखीची जबाबदारी श्मिट यांच्याकडे होती. २०१५ मध्ये त्यांनी नियामकांची भेट घेतली होती, मात्र सॉफ्टवेअरचा उल्लेख केला नव्हता.  


श्मिट यांनी तपासकर्त्यांची फसवणूक केली. प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज नष्ट केले,असे अमेरिकी सरकारचे म्हणणे आहे. श्मिट कंपनी लीडरच्या भूमिकेत होती. महत्त्वाच्या निर्णयातील त्यांची संमती या गुन्हेगारी योजनेमध्येही होती. कंपनीने चुकीची कबुली देत अब्जावधी डॉलरचा दंड देण्याचे कबूल केले होते. श्मिट उच्च पदावर काम करणारे दुसरे व्यक्ती आहेत, ज्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये माजी अभियंता जेम्स लियान यांना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे.  

 

फ्लोरिडात सुट्या घालवल्यानंतर परतत असताना श्मिट यांना झाली अटक  

जगभरात १.१ डिझेल कारमध्ये असे सॉफ्टवेअर बसवण्यात आल्याची कबुली फॉक्सवॅगने दिली होती. या गाड्यांमध्ये ठरलेल्या मर्यादेपेक्षा २०-३० % जास्त उत्सर्जन होत होते. मात्र, चाचणीवेळी सॉफ्टवेअरमुळे ते पकडले जात नव्हते. कंपनीच्या दुसऱ्या अधिकाऱ्यावरही अमेरिका कारवाई करेल. त्यातील बहुतांश जर्मनीत असल्यामुळे प्रत्यार्पण होणे कठीण आहे. श्मिट जानेवारीत फ्लोरिडात सुट्या घालवून परतताना अटक करण्यात आली होती. एफबीआयमध्ये दाखल तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध ही कारवाई झाली.  

बातम्या आणखी आहेत...