आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने कर्ज उद्योग दोन वर्षांत 45% वाढेल : केपीएमजी;2.14 लाख कोटींवरून 3.10 लाख कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात एकत्रित सोने कर्ज उद्योग सध्या २.१३९ लाख कोटी रुपयांचा आहे. हा २०१९-२० मध्ये ३.१०१ लाख कोटी रुपयांचा होईल. कन्सल्टन्सी संस्था केपीएमजीने एका अभ्यास अहवालात ही माहिती दिली आहे. यामध्ये दोन वर्षांत या उद्योग क्षेत्रात होणाऱ्या ४५ टक्क्यांपर्यंतच्या वाढीचे कारणेदेखील मांडण्यात आली आहेत. कंपन्या कमी व्याजदरावर आणि कमीत कमी कागदपत्रांच्या पूर्ततेसह कर्ज देत असल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोने भावाचा कर्जावर जास्त परिणाम होऊ नये, यासाठी कंपन्या कमी कालावधीसाठीच्या उत्पादनांचा पर्याय निवडत आहेत. केपीएमजीने सेन्ट्रलाइज्ड गोल्ड लॉकरची संख्या आणि ग्राहकांसाठी सोने लॉकरची संख्या दुपटीने वाढवण्याचा सल्ला दिला आहे.  


देशात सोने कर्ज दोन पद्धतीने दिले जाते. एक तर संघटित क्षेत्र आहे, ज्यामध्ये बँक आणि एनबीएफसी कर्ज देते. दुसऱ्या पद्धतीत सावकार बँकांच्या तुलनेत खूप जास्त व्याजदरावर कर्ज देतात. अलीकडच्या काळात मंजुरी मिळणे सुलभ झाल्यामुळे संघटित क्षेत्रातील सोने कर्जाची लोकप्रियता खूपच वाढली आहे. कर्जाच्या बदल्यात कर्जदार त्याच्याकडील सोने ठेवत असल्याने कर्ज देणाऱ्यांसाठी ही पूर्णपणे सुरक्षित पद्धत ठरत आहे. कर्ज घेणाऱ्याने कर्ज परत केले नाही तर सोने विक्री करून कर्ज देणारे भरपाई करू शकतात. त्यासाठी बँका आणि एनबीएफसीने या कर्ज प्रक्रियेतील मंजुरी सुलभ केली आहे.


सोने लॉकरचे केंद्रीकरण करण्याचा सल्ला

छोट्या बँका या क्षेत्रात आल्याने या क्षेत्रातील प्रतिस्पर्धा वाढणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी या अहवालामध्ये “सेंट्रलाइज्ड गोल्ड लॉकर युनिट’ उभारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणताही व्यक्ती येथे सोने ठेवून डिजिटल प्रमाणपत्र मिळवू शकतो. यामुळे प्रत्येक शाखेला स्वतंत्र वॉल्टची आवश्यकता भासणार नाही. यामुळे स्टोरेज आणि व्यवस्थापनावर खर्चही कमी होईल. सोन्याची मूल्य गणनाही सारखी होऊन लॉकर शुल्कही 
कमी लागेल.

बातम्या आणखी आहेत...