आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर: मोदी सरकारकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत 2 लाख कमविण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - आपणही एखाद्या कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काही करण्याची इच्छा असेल तर मोदी सरकारची ही योजना आपल्यासाठीच आहे. स्वच्छ भारत समर इंटर्नशिप योजाना मोदी सरकारने पुन्हा सुरू केली आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून आपण गावात स्वच्छता आणि तेथील नागरिकांना जागरुक करण्याचे काम करू शकता. सोबतच आपल्या योगदानाचा मोबदला म्हणून 10 हजार रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळू शकते. विशेष म्हणजे, 15 मे रोजी योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख होती. पण, मोदी सरकारने त्यामध्ये 15 जून पर्यंतची मुदतवाढ केली आहे. 


द्यावे लागतील 100 तास
'स्‍वच्छ भारत समर इंटर्नशिप- स्‍वच्‍छतेसाठी 100 तास' असे या योजनेचे नाव आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय, तसेच पेयजल आणि स्वचछता मंत्रालयाने संयुक्तरित्या ही योजना लागू केली. यात युवकांना किमान 100 तास ग्रामीण भागांमध्ये स्वच्छतेशी संबंधित कामे करावी लागतील. 1 मे ते 31 जुलै पर्यंत ही कामे चालणार आहेत. तसेच इच्छुकांना 15 जून पर्यंत त्यासाठी अप्लाय करता येणार आहे. देशभरातील जास्तीत-जास्त युवकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेणे हा त्या मागचा हेतू आहे. 


पुढे वाचा, असे करू शकता अप्लाय तसेच योजनेच्या अटी...

बातम्या आणखी आहेत...