आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांवर नियंत्रणासाठी अधिकार वाढवा : RBI गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अधिकारात वाढ करण्याची आवश्यकता असल्याची मागणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पुन्हा केली आहे. पटेल यांनी मंगळवारी संसदेच्या अर्थविषयक समितीसमोर ही मागणी केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका मोठ्या प्रमाणात एनपीएच्या चक्रात अडकलेल्या असताना त्यांनी अधिकारात वाढ केल्याची मागणी केल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेे. 


काँग्रेसचे खासदार वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने त्यांना बँकेची फसवणूक, रोख रकमेचे संकट आणि इतर प्रकरणांवर प्रश्न विचारण्यासाठी बोलावले होते.  
सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण नसल्याचे पटेल यांनी सांगितले. अाॅडिटच्या दृष्टीने पाहिल्यास केंद्रीय बँक प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेचे ऑडिट करू शकत नाही. त्यामुळे सर्व बँकांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी जास्त अधिकार आणि शक्तीची आवश्यकता असल्याचे गव्हर्नर पटेल यांनी या समितीसमोर स्पष्ट केले.  

बातम्या आणखी आहेत...