आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय अर्थव्यवस्था 2018 मध्ये सर्वाधिक गतीने वाढेल; आयएमएफचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/दावोस- जागतिक बँकेनंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) २०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक ोगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार असल्याचे मान्य केले आहे. नोटबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी)  परिणामांना मागे टाकत भारत २०१८ मध्ये ७.४ टक्के आणि २०१९ मध्ये ७.८ टक्के विकास दर मिळवणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. आयएमएफच्या वतीने नुकताच जाहीर करण्यात आलेल्या  “वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’मध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दावोसमध्ये “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ चे संमेलन सुरू हाेण्याच्या अगदी आधी हा अहवाल प्रकाशित झाला आहे.  


आयएमएफच्या या अहवालामध्ये भारताचा विकास दर चीनपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालात २०१८ मध्ये चीनचा विकास दर ६.८ टक्के आणि २०१९ मध्ये ६.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार असल्याचे या अहवालावरून दिसून येते. मागील वर्षी नोटबंदी आणि जीएसटी लागू झाल्याने विकास दर थोडा मंदावला होता.  


चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर थोडा मंद झाला असल्याचे भारत सरकारने मान्य केले आहे. अशा वेळी हा आयएमएफचा अहवाल सरकारला दिलासा देणारा ठरणार आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) पाच जानेवारी रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये देशाचा विकास दर ६.५ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात 
आली आहे. 


मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ७.१ टक्के विकास दर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर १० जानेवारी रोजी जागतिक बँकेने अंदाज जाहीर केला होता. यात भारतीय अर्थव्यवस्था २०१८ मध्ये पुन्हा एकदा चीनला मागे टाकून पुढे जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. २०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के आणि त्यानंतर सलग दोन वर्षांपर्यंत ७.५ टक्के राहणार असल्याचा यात उल्लेख होता.

 

जागतिक अर्थव्यवस्थेतही तेजी 

अायएमएफच्या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेविषयीही सकारात्मक वाढ नोंदवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर २०१८ आणि २०१९ मध्ये विकास दराच्या अंदाजात दुरुस्ती करून ३.९ टक्के करण्यात आला आहे. मागील अंदाजापेक्षा या वेळी यात ०.२ टक्के वाढ करण्यात आली आहे. २०१७ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ३.७ टक्के आणि २०१६ मध्ये ३.२ टक्के दराने वाढली होती.

 

बातम्या आणखी आहेत...