Home | Business | Business Special | share market slips post press conference by senior supreme court judges democracy

न्यायमूर्तींच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर कोसळला शेअर बाजार, विक्रमी पातळीवर झाली होती सुरुवात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2018, 03:10 PM IST

आठवड्याच्या शेवटी व्यवसायाची सुरूवात विक्रमी वाढीसह करणारा भारतीय शेअर बाजार एका झटक्यात खाली कोसळला. तज्ञांचे म्हणणे आह

  • share market slips post press conference by senior supreme court judges democracy

    नवी दिल्ली - आठवड्याच्या शेवटी व्यवसायाची सुरूवात विक्रमी वाढीसह करणारा भारतीय शेअर बाजार एका झटक्यात खाली कोसळला. तज्ञांचे म्हणणे आहे की, बाजारातील वाढ ही इन्फोसीसच्या निकालापुर्वीच्या तेजीमुळे होती. परंतु आज दुपारी 12 वाजेनंतर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची प्रेस कॉन्फरन्सची बातमी आली. तसा बाजार गडगडतांना दिसला. प्रेस कॉन्फरन्समध्ये न्यायमूर्ती जेव्हा न्यायसंस्थेला वाचवण्याचे आणि लोकशाहीच्या रक्षणाबाबत बोलले तेव्हाच भारतीय शेअर बाजार दिवसभरातील वाढ गमावून बसला.

    हे महत्वाचे आहे की, निफ्टीने 30.35 अंकाच्या बढतीसोबत 10681 ने नवीन विक्रमाला गाठले होते. तेथेच सेंसेक्सने 97.04 अंकाच्या वाढीसोबत आपला सर्वाधिक स्तर 34,600.53 ने पार केला आहे. पण प्रेस कॉन्फरन्सनंतर सेंसेक्स 100 अकांनी खाली लाल निशान्यावर गेला आहे. तेथेच निफ्टीही 30 अकांच्या वाढीला गमावत प्रेस कॉन्फरन्सनंतर लाल निशान्यावर गेला आहे.

    काय आहे प्रकरण...
    देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोर्टाचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ हे पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

  • share market slips post press conference by senior supreme court judges democracy

Trending