आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता परदेशातून भारतात कॉलिंग होणार स्वस्त;ट्रायने आंतरराष्ट्रीय कॉलचे टर्मिनेशन घटवले शुल्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दूरसंचार नियामक ट्रायने आंतरराष्ट्रीय कॉलचे टर्मिनेशन शुल्क ५३ पैशांवरून घटवत ३० पैसे प्रतिमिनिट केली आहे. हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होईल. ट्रायनुसार व्हॉट्सअॅप व स्काइपद्वारे होणाऱ्या आयएसडी कॉलवर यामुळे लगाम बसेल. तसेच देशातील दूरसंचार कंपन्यांचा यामुळे मोठा फायदा होईल. तथापि, सीओएआयनुसार यामुळे कंपन्यांना सुमारे २ हजार कोटी रुपयांचा फटका बसेल. भारतीय कंपन्यांच्या नेटवर्कवरून विदेशी कंपनीच्या नेटवर्कवर कॉल गेल्यास ती कंपनी प्रतिमिनिट २.५७ रुपये शुल्क आकारते. 

बातम्या आणखी आहेत...