आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांनी 100 कंपन्यांना उत्सर्जन कमी करण्यास सांगितले; वातावरण बदलाविरुद्ध मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

ओस्लो- जगातील २२५ गंुतवणूक कंपन्यांनी पहिल्यांदाच वातावरण बदल रोखण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यंानी सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या १०० कंपन्यांना याचा स्तर कमी करण्यास सांगितले आहे. यामध्ये कोकाकोला व नेस्ले यासारख्या ग्राहकोपयोगी उत्पादने, बीएचपी बिल्टन व रियो टिंटो यासारख्या खाण व गॅजप्रॉम व एक्सॉनमोबिलसारख्या पेट्रोलिय कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांमध्ये बहुतांश म्युचअल व पेन्शन फंड आहेत. त्यांची असेट अंडर मॅनेजमेंट(एयूएम) १,७०० लाख कोटी रुपये आहे. ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या १० पट व अमेरिकेच्या जीडीपीच्या दीडपट आहे.


मंगळवारी पॅरिसमध्ये सुरू झालेल्या “वन प्लॅनेट समिट’चे उद्््घाटन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रो यांनी केले. यामध्ये ट्रम्प यांना निमंत्रण दिले नाही. भारत,चीन, ब्राझील, रशिया, कॅनडा व जर्मनीचे प्रतिनिधीही आले नाहीत. दोन वर्षांपूर्वी १९५ देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली होती.


गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, दुष्काळ, भूस्खलन आणि समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीसाठी कंपन्याही दोषी आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी ते यांच्यासोबत मिळून आराखडा तयार करतील. कंपनीतून गुंतवणूक काढण्याची धमकी देण्यापेक्षा त्यांच्यासोबत काम करणे चांगले. याआधी सार्वजनिक निवेदन व मतदानाद्वारे दबाव तयार करू. या वर्षी मे महिन्यात एक्सॉनमोबिलच्या ६२% गुंतवणूकदारांनी बोर्डाच्या विरोधानंतरही अधिक पारदर्शकतेसाठी मतदान केले होते. गुंतवणूकदारांनी कंपन्यांना हरितगृह वायू उत्सर्जनाचे आकडे सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. त्यांच्या उत्पादनाच्या वापरामुळे किती विषारी वायू उत्सर्जित होतो हे पण सांगण्याची मागणी केली होती.

२०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन ८०% कमी करण्याचे उद्दिष्ट

>युरोपीय संघटना ३ वर्षंात ६७,००० कोटी रुपये गुंतवणार : युरोपीय संघटनेने वातावरण बदल रोखण्यासाठी ९ अब्ज युरो(६७,५०० कोटी रु.) गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ही रक्कम २०२० पर्यंत सस्टेनेबल सिटी, सस्टेनेबल एनर्जी व कनेक्टिव्हिटी व सस्टेनेबल अॅग्री व कृषी व्यवसायात गंुतवणार आहे.


> वातावरण बदलाविरुद्ध मोहिमेला २३७ कंपन्यांचा पाठिंबा : २३७ कंपन्यांनी वातावरण बदलाविरुद्धच्या मोहिमेस पाठिंबा दिला आहे. या कंपन्यांचे बाजार भांडवल ४१० लाख कोटी रुपये आहे. यामध्ये १५० कंपन्यांची मालमत्ता ५,३०० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मोहिमेत सहभागी कंपन्यांची संख्या ५ वर्षांत दुप्पट झाली आहे.  दरम्यान, फ्रेंच विमा कंपनी अक्साने नव्या कोळसा, टार सँड्स ऑइल प्रकल्पाला विमा देणार नसल्याचे म्हटले आहे. यामध्ये २२,५०० कोटी रुपयांची गुंतवणूकही काढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...