आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रामध्ये वार्षिक 30 लाख रोजगारांच्या संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगारांचे सर्वात माेठे माध्यम अाहे. सध्या हे क्षेत्र सुमारे ५.२ काेटी लोकांसाठी रोजगाराचे माध्यम अाहे. सन २०२२पर्यंत रिअल इस्टेट अाणि बांधकाम क्षेत्रात १.५ काेटी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण हाेतील.

 

काेणत्याही देशाच्या पायाभूत विकासात रिअल इस्टेट व बांधकामांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. याशिवाय हे क्षेत्र रोजगारांचेही एक माेठे माध्यम असते. संसदेत नुकत्याच सादर करण्यात अालेल्या अार्थिक पाहणीनुसार कृषी क्षेत्रानंतर रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार अाहेत. या अहवालानुसार २०१३मध्ये रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रात ४ काेटी लोकांना रोजगार मिळाला हाेता. २०१७मध्ये यात काम करणाऱ्यांची संख्या वाढून ५.२ काेटी झाली. आगामी काळात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील. अार्थिक पाहणीनुसार २०२२पर्यंत या क्षेत्रात १.५ काेटी नवीन लोकांना रोजगार मिळेल व यातील एकूण वर्कफोर्स वाढून ६.७ काेटी होईल. 


बांधकाम क्षेत्राची देशाच्या जीडीपीत सुमारे ८ % भागीदारी अाहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प व पायाभूत विकासासाठीच्या योजनांमुळे या क्षेत्राचा वेगाने विस्तार होत अाहे. पुढील २० वर्षांत या क्षेत्रात सुमारे ४ लाख काेटी रुपये (६५० अब्ज डॉलर्स) गुंतवले जाण्याची शक्यता अाहे. केवळ रिअल इस्टेटचा विचार करता, २०२०पर्यंत याची बाजारपेठ सुमारे १ लाख काेटी रुपये (१८० अब्ज डॉलर्स) एवढी हाेईल. यात काम करणारे ८० % वर्कफोर्स अकुशल अाहे. त्यामुळे या क्षेत्रात आगामी काळात कुशल वर्कफोर्सची सर्वाधिक गरज भासेल. यात सिव्हिल इंजिनिअरिंग, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, बांधकाम व्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राेजगारांच्या अनेक संधी असतात. 


आर्किटेक्चर अॅँड प्लॅनिंग
सिव्हिल इंजिनिअरिंगप्रमाणेच आर्किटेक्चर व प्लॅनिंगच्या पदवीला प्रवेशासाठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक अाहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा बॅचलर ऑफ प्लॅनिंगला प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर चाचणी परीक्षा हाेतात. या अभ्यासक्रमांनंतर देशभरातील विविध संस्थांत प्रवेश मिळवता येऊ शकताे. तथापि, काही संस्था स्वत:च्या प्रवेश परीक्षाही घेतात.


सिव्हिल इंजिनिअरिंग
बांधकाम क्षेत्रात सिव्हिल इंजिनिअरिंग हा करिअरचा एक चांगला पर्याय ठरू शकताे.  भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्र व बीजगणित हे विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बी.ई. वा बी.टेक.ला प्रवेश घेऊ शकतात. याच्या पदवी अभ्यासक्रमाला ‘जेईई मेन’च्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळताे, तर आयआयटी संस्थांत प्रवेशासाठी ‘जेईई अॅडव्हान्स’ही उत्तीर्ण व्हावी लागते. पदवीनंतर एम.टेक.लाही प्रवेश घेऊ शकतात. नामांकित संस्थांच्या एम.टेक.ला प्रवेशासाठी ‘गेट’चे व्हॅलिड गुण लागतात. 


व्यवस्थापनातही संधी 
रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रात व्यवस्थापन व्यावसायिकांची खूप गरज असते. एमबीए करणारे विद्यार्थी यात करिअर करू शकतात; परंतु याचा विशिष्ट अभ्यासक्रम करणाऱ्यांना चांगले पॅकेज मिळण्याची शक्यता असते. काेणत्याही शाखेच्या पदवीनंतर रिअल इस्टेट मॅनेजमेंटला प्रवेश घेऊ शकतात. बी.ई. वा बी.टेक. करणाऱ्यांना बांधकाम व्यवस्थापनास प्रवेश मिळू शकताे. या अभ्यासक्रमांना कॅट, मॅट, सी-मॅट, जी-मॅटमधील व्हॅलिड गुणांच्या आधारे प्रवेश मिळताे.


अनुभवासाेबत चांगले पॅकेजही
या क्षेत्रात वेतन पॅकेज अनुभव व संस्थेनुसार वेगळे असू शकते. रिअल इस्टेट व बांधकाम व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्यांना प्रारंभी १५ ते २० हजार रुपये दरमहाचे वेतन पॅकेज मिळण्याची शक्यता असते. अनुभवानंतर ते ३५ ते ४० हजार रुपये दरमहा होऊ शकते. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये २०-२५ हजार पॅकेज मिळते

बातम्या आणखी आहेत...