आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात सर्वाधिक सॅलरी पॅकेज कलानिधी मारन यांचे, टॉप-10मध्‍ये मुकेश अंबानींचा समावेश नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरूनानी यांना 2017-18मध्‍ये सॅलरी पॅकेज म्‍हणून 146 कोटी रुपये मिळाले आहे. कंपनीच्‍या उत्‍कृष्‍ट परफॉर्मंसमुळे त्‍यांना हे पॅकेज देण्‍यात आले आहे. मात्र कंपनीचे मालक किंवा प्रमोटर्स म्‍हणून कलानिधी मारन हे देशात सर्वाधिक सॅलरी पॅकेज घेणारे प्रमोटर्स आहेत. 2016-17मध्‍ये त्‍यांना 77.9 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते. विशेष बाब म्‍हणजे प्रमोटर्सच्‍या टॉप-10 लिस्‍टमध्‍ये देशातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती मुकेश अंबानी यांचा समावेश नाही. या वर्षी त्‍यांना केवळ 15 कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळाले आहे. 


> कलानिधि मारन 
- सन टीव्‍ही नेटवर्कचे Executive Chairman

- सॅलरी- 77.9 कोटी रुपये 


सन टीव्‍ही नेटवर्क देशातील सर्वात मोठे टेलिव्‍हजन ब्रॉडकॉस्‍टर आहे. कंपनीचे तामिळ, तेलगू, कन्‍नड आणि मल्‍याळम भाषेत टेलिव्हिजन चॅनेल्‍स आहेत. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांचे एफएम रेडिओ स्‍टेशन्‍सही आहेत. त्‍यांनी नुकतेच मल्‍याळम कॉमेडी चॅनेल सुर्या कॉमेडी सुरू केले आहे. 

 

नोट- या यादीत आर्थिक वर्ष 2016-17मध्‍ये टॉप पॉझिशनवर असलेल्‍या कंपनीच्‍या प्रमोटर्सच्‍या सॅलरीचा समावेश करण्‍यात आला आहे. सॅलरीमध्‍ये सॅलरी, पर्क्‍स, कमीशन, बोनस, परफॉर्मंस पे, पीएफमध्‍ये योगदान आणि स्‍टॉक ऑप्‍शन यांचा समावेश करण्‍यात आला आहे. ही सर्वर माहिती बिझनेस टुडेमधून घेण्‍यात आली आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर प्रमोटर्सची किती आहे सॅलरी... 

 

बातम्या आणखी आहेत...