आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात घडली बिटकॉइनची चोरी, मारहाण करुन लंपास केले 11 कोटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हर्च्युअल करन्सी बिटकॉइनच्या चोरीची घटना तायवानमध्ये समोर आली आहे - प्रातिनिधक फोटो - Divya Marathi
व्हर्च्युअल करन्सी बिटकॉइनच्या चोरीची घटना तायवानमध्ये समोर आली आहे - प्रातिनिधक फोटो

व्हर्चुअल करन्सीची चोरीची घटना झाल्याचे कधी तुमच्या ऐकिवात आले आहे का?  खरं तर ही अशक्य गोष्ट असल्याचे तुमच्यापैकी ब-याच जणांना वाटले असावे. पण अशी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बिटकॉइन (क्रिप्टो करन्सी) या व्हर्च्युअल करन्सीच्या चोरीची घटना तायवानमध्ये घडली आहे. या देशात बिटकॉइन चोरीचे हे पहिलेच प्रकरण उघडकीस आले आहे. चोरट्यांनी 50 लाख तायवानी डॉलर (1.70 लाख अमेरिकन डॉलर) अर्थातच सुमारे 11 कोटी रुपये लंपास केले आहेत. विशेष म्हणजे, तायवान पोलिसांनी या प्रकरणात चार लोकांना अटक केली आहे.


तायवान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपी विशीतील असून त्यांना ताईचंग सिटीतील एका व्यक्तीला बिटकॉइन खरेदी करणार असल्याचे आमिष दाखवले. ताईचंगने त्यांना त्याच्या फोनमध्ये बिटकॉइनचा पुरावा दाखवला. त्यानंतर या तरुणांनी ताईचंग आणि त्याच्या एका मित्रावर हल्ला केला. या आरोपी तरुणांनी 50 लाख तायवानी डॉलर किंमतीचे 18 बिटकॉइन ताईचंगच्या अकाउंटहून त्यांच्या फोनमध्ये ट्रान्सफर केले.  

 

बिटकॉइन चोरीची पहिलीच घटना... 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तर अन्य दोन पळून जाण्यात अपयशी ठरले. पोलिसांना घटनास्थली रक्ताचे डाग मिळाले. चौकशीअंती ही घटना बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीच्या चोरीची असल्याचे समोर आले.  ही घटना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठड्यात घडली असून पोलिसांनी ही देशातील पहिलीच बिटकॉइन रॉबरी असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी अन्य दोन आरोपींनाही गजाआज केले आहे. तर या घटनेच्या मास्टरमाइंडच्या शोधात सध्या पोलिस आहेत. 


पुढे वाचा, काय आहे बिटकॉइन? 

बातम्या आणखी आहेत...