आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये असे विकतात सॅनिटरी पॅड्स, वापरले जातात हे फंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - महिलांच्या सॅनिटरी पॅड्सच्या मुद्द्यावर बनलेल्या बॉलीवूड अॅक्टर अक्षय कुमारच्या 'पॅडमन' चित्रपटाचे भारतात जिथे कौतुक होत आहे, तिथे पाकिस्तानात मात्र यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय पाकिस्‍तानच्या फेडरल सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, चित्रपट त्यांची संस्कृती आणि परंपरेविरुद्ध आहे. परंतु तुम्ही जाणून चकित व्हाल की, पाकिस्तानातही सॅनिटरी पॅड्सचा प्रचंड मोठा उद्योग आहे आणि कंपन्या ते विकून कोट्यवधी कमावतात. याशिवाय महिलांपर्यंत सॅनिटरी पॅड्स पोहोचवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. आज आम्ही अशाच काही कंपन्यांबाबत सांगत आहोत, जे पाकिस्तानात सॅनिटरी पॅड्सचा बिझनेस करून रग्गड पैसा कमावत आहेत.

 

ही आहे पाकची सर्वाधिक चर्चित कंपनी...
पाकिस्‍तानात सॅनिटरी पॅडसाठी सर्वात जास्त चर्चित 'ट्रस्‍ट' नावाचा ब्रँड आहे. हा ब्रँड पॅन इंडस्‍ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचा आहे. या कंपनीने 2016 मध्ये 168 कोटी पाकिस्तानी रुपयांच्या सॅनेटरी नॅपकीनची विक्री केली होती. या कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस कराचीमध्ये आहे.
 
असा होतो प्रचार...
या कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात महिलांना सॅनेटरी पॅडची फ्री होम डिलिव्हरी दिली जाते. याशिवाय देशातील महिलांना पीरियडशी संबंधित माहितीही दिली जाते. कंपनी ग्रामीण भागात लहान-लहान इव्हेंटच्या माध्यमातून महिलांमध्ये पीरियडसंबंधी जनजागृती करते.
 
बटरफ्लाय पॅड 
पाकिस्‍तानात बटरफ्लाय ब्रँडच्या सॅनेटरी पॅडचीही महिला खरेदी करतात. हा santex कंपनीचा ब्रँड आहे. ही अशी पहिली कंपनी आहे जिने 1982 मध्ये पाकिस्‍तानात सॅनेटरी नॅपकीनची निर्मिती सुरू केली. कंपनीचे हेडक्‍वार्टर कराचीत आहे.

> पाकिस्‍तानी मीडियानुसार, 90च्या दशकात बटरफ्लाय ब्रँडच्या सॅनेटरी पॅडची लोकप्रियता सर्वात जास्त राहिली. परंतु सन 2000 मध्ये कंपनीच्या कारभारात सुस्ती आली. तथापि, नंतर कंपनीने मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये बदल करत याला सोशल इश्यू बनवण्याचा प्रयत्न केला. यासाठी कंपनीने अनेक विदेशी कंपन्यांशी हातमिळवणी केली. यात चीनची अलीबाबाही सामील आहे. सध्या महिलांमध्ये बटरफ्लाय ब्रँडने लोकप्रियता मिळवली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, महिला डॉक्‍टर्स ऑनलाइन महिलांना पीरियड्सबाबत जागरूक करत आहेत आणि फ्रीमध्ये ऑनलाइन सल्लाही देत आहेत.

 

पुढे वाचा... तब्बल 79 टक्के पाक महिला का वापरत नाहीत सॅनिटरी पॅड्स...

बातम्या आणखी आहेत...