आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉजिस्टिक्स क्षेत्रात वार्षिक दहा लाखांहून अधिक रोजगारांच्या संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच सादर झालेल्या अार्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले अाहे की, जीएसटी लागू झाल्याने लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम हाेईल. त्यानुसार सध्या देशातील लॉजिस्टिक्स क्षेत्र सुमारे १ लाख काेटी रुपयांचे (१६० अब्ज डॉलर्स) अाहे. हे क्षेत्र पुढील दाेन वर्षांत सुमारे १.४ लाख काेटी रुपयांचे (२१५ अब्ज डॉलर्स) होईल. लॉजिस्टिक्स, वाहतूक व वेअर हाऊसिंगची प्रत्येक उद्याेगात महत्त्वाची भूमिका असते. पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या विकासामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विस्तारास मदत मिळेल. या क्षेत्राला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा देण्याबाबतही चर्चा सुरू अाहे. सध्या हे क्षेत्र सुमारे १०.५ %  दराने वाढत अाहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील. तथापि, हे क्षेत्र अजूनही स्किल गॅपच्या समस्येचा सामना करत अाहे. राष्ट्रीय काैशल्य विकास महामंडळाच्या अहवालानुसार ही समस्या निकाली काढण्यासाठी २०२२पर्यंत ५४ लाख नवीन लोकांची गरज भासेल. रोजगाराच्या दृष्टीने पाहिल्यास या क्षेत्रात वार्षिक १० लाखांहून  अधिक राेजगारांच्या संधी असतील. यात खालपासून उच्च काैशल्य असलेल्या व्यावसायिकांना नाेकरीच्या संधी असतील. या क्षेत्रात सर्वाधिक भागीदारी वाहतुकीची असते. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट रोडवेजमध्ये वार्षिक ६ लाखांहून जास्त संधी असतील. 


काेणत्याही शाखेचे विद्यार्थी करू शकतात करिअर
या क्षेत्रात काेणत्याही शैक्षणिक पूर्वेतिहासाचे विद्यार्थी करिअर करू शकतात. काेणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. तसेच पुरवठा व व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमही केला जाऊ शकताे. पदवी मिळवलेले विद्यार्थी याच्या एमबीएला प्रवेश घेऊ शकतात. एमबीएला कॅट, जॅट, मॅट, सी-मॅट, जी-मॅट किंवा एटीएमएचे व्हॅलिड गुण, समूह चर्चा व वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे प्रवेश मिळताे. तथापि, काही संस्था स्वत:च्या प्रवेश चाचण्या आयोजित करतात. 


विविध उद्याेगांमध्ये करू शकता नाेकरी
सुरुवात म्हणून या व्यावसायिकांना ग्राहक सेवा व्यवस्थापन,  वितरण व ऑपरेशन कारकून अादी पदांवर नाेकरी करण्याची संधी मिळू शकते. अनुभव वा उच्च पात्रता असलेले व्यावसायिक उद्याेग विश्लेषक, प्रकल्प व्यवस्थापक, ग्लोबल लॉजिस्टिक्स व्यवस्थापक, ऑपरेशन संचालक, वाहतूक संचालक व अांतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स व्यवस्थापक, वेअर हाऊस व्यवस्थापक अादी पदांवर नाेकरी करू शकतात. लॉजिस्टिक्स कंपन्या, विमानसेवा कंपन्या, पोर्ट ऑपरेटर्ससह अशा खासगी संस्था, जेथे लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे काम होते. याशिवाय विविध क्षेत्रांत या व्यावसायिकांची अावश्यकता असते. 


व्यवस्थापक स्तरावरील पदांसाठी वार्षिक ५-६ लाखांचे पॅकेज : सुरुवातीला १०-१५ हजार रुपये महिना, तर व्यवस्थापक स्तरावरील पदांसाठी प्रारंभीच ३०-३५ हजार रुपये महिन्याचे पॅकेज मिळू शकते. अनुभवानंतर महिना ५०-६० हजार रुपये मिळू शकतात. 


विविध स्तरांच्या आधारे काैशल्यांची गरज
उच्च स्तर :
वेअर हाऊस व्यवस्थापक, ऑपरेशन व्यवस्थापक, पर्चेसिंग मॅनेजर, पुरवठा, कॉन्ट्रॅक्ट व अायात/निर्यात व्यवस्थापक आदी.
ही काैशल्ये अाहेत गरजेची : आयटी, डेटा व अॅनालिटिकल स्किल, मेकॅनिकल व डिजिटल दोन्ही स्तरांवर काम करण्याची अावश्यकता. 
मधला स्तर : इन्व्हेंट्री लेव्हल, ट्रान्सपोर्ट शेड्यूलर, अायात/निर्यात अधिकारी, शिफ्ट सुपरवायझर, लॉजिस्टिक्स सुपरवायझर, वेअर हाऊस सुपरवायझर.
ही काैशल्ये अाहेत गरजेची :  पर्यवेक्षणाचे काैशल्य, वेअर हाऊसिंगशी निगडित समस्या साेडवण्याचा अनुभव.
प्रवेश स्तर : लॉजिस्टिक्स अॅडमिनिस्ट्रेटर, पिकर, वाहन-चालक, लिफ्ट ऑपरेटर अादी 
ही काैशल्ये अाहेत गरजेची : अावश्यक तंत्रज्ञान काैशल्याची माहिती असावी

बातम्या आणखी आहेत...