आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी,अडाणी ग्रुपचे 3 दिवसात 64 हजार कोटींचे नुकसान;कंपण्‍याची मार्केट कॅप घटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  अर्थसंकल्पमध्‍ये दीर्घकालिन भांडवली नफ्यावर 10 टक्के कर लावण्‍याचा निर्णय आणि ग्‍लोबल मार्केट पडल्‍याचा परिणाम भारतीय बाजारात पहायला मिळाला. मंगळवारी शेअर बाजारामध्‍ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 561 पॉइंट पडून 34,196 तर निफ्टी 164 पॉइटने खाली जाऊन 10,498 वर बंद झाले. मागील तीन दिवसांचा घसरणीचा परिणाम 10 मोठ्या कपण्‍यांवर पहायला मिळाला. मुकेश अबांनी यांची रिलायंन्‍स इंडस्‍ट्रीज आणि गौतम अडाणी ग्रुपचे 3 दिवसात 64 हजार करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.  

 

कोणत्‍या 10 मोठ्या कंपण्‍याचे किती शेअर घटले आणि मार्केट कॅप किती घसरली?

कंपनी  किती शेअर घटले  मार्केट कॅप किती घटली ( करोड रु. ) आता किती आहे मार्केट कॅप( करोड रु. )
TCS 3.41% 21,251 5,73,396.13 
इंफोसिस 2.68% 7004 2,42, 095.69
टाटा मोटर्स 5.14% 6222 1,08,116.76
कोटक बैंक 2.68% 5527 1,96,888.59
HCL 3.96% 4719 1,32,854.59
टेक महिंद्रा 3.55% 2253 59,369.47
ल्युपिन 5.68% 2250 36,239.18
सिप्ला 2.73% 1208 45,534.55
अरबिंदो फार्मा 2.79% 996 34,933.24
UPL लिमिटेड 3.11% 1119 35,621.56
     
     

 

मुकेश अंबानीला कसे झाले नुकसान 
- अर्थसंकल्प सादर झाल्‍या पासुन शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. मागील तीन दिवसात रिलायन्‍स इंडस्‍ट्रीजच्‍या मार्केट कॅपमध्‍ये 45, 593 करोड रुपायांची घसरण झाली. स्‍टॉक 8 टक्‍यांपेक्ष जास्‍त तुटलेला पहायला मिळाला. 1 फेब्रुवारीला रिलायन्‍स इंडस्‍ट्रीजची मार्केट कॅप 5,97,838 रुपये होती ती मंगळवारी घटून 5,52,245 करोड रु. झाली.    

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, देशातील तीन बड्या कंपन्यांचे ६३ हजार कोटी नुकसान... 

 

बातम्या आणखी आहेत...