आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या होणा-या व्याहीपेक्षा 60 पट धनाढ्य आहेत मुकेश अंबानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानी यांच्या मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याचा विवाह हीरे व्यापारी आणि रोझी ब्लू मालक रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी होणार आहे. या दोघांचे लग्नकार्य डिसेंबरमध्ये होऊ शकते. अंबानी कुटुंब किंवा मेहता कुटुंबियांकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. मुकेश अंबानी आपले होणारे व्याही मेहता यांच्या तुलनेत 60 पट अधिक श्रीमंत आहेत.

 

2015 च्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी भारतातील सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत क्रमांक एकवर होते. तर, मेहता याच यादीमध्ये 229 व्या क्रमाकांवर होते. 2016 आणि 2017 च्या यादीत रसेल मेहता यांना जागाही मिळाली नाही. तर, मुकेश अंबानी आजही पहिल्या क्रमांकावर आहेत. 


कोण आहेत रसेल मेहता
- बेल्जिअममध्ये असलेली कंपनी रोझी ब्लू मेहता कुटुंबियांच्या मालकीची आहे. जगातील सर्वात मोठ्या डायमंड ज्वेलरी कंपन्यांपैकी ही एक आहे. 
- ऑरा डायमंड ज्वेलरी ब्रॅन्ड त्यांचेच आहे. आधी त्यांच्या कंपनीकडून हिऱ्यांच्या दागिन्यांची ट्रेडिंग सुद्धा केली जायची. 1973 मध्ये रसेल मेहता यांनी कंपनीची सूत्रे हाती. 
- आता रोझी ब्लूच्या दोन कंपन्या आहेत. त्यापैकी एक इंडिया रोझी ब्लू (भारतात) आणि दुसरी इतर देशांमध्ये बिझनेस करत आहे. 2011-12 च्या आकडेवारीनुसार, या कंपन्यांची 4000 कोटी रुपयांची उलाढाल आहे. 


देशातील सर्वात धनाढ्य उद्योजक मुकेश अंबानी
रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी भारतातील सर्वात धनाढ्य उद्योजक आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना जगभरात पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन वर्षांपासून जिओ 4जी आणि मोबाईलमुळे त्यांची मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी सुद्धा देशभर चर्चेत आहेत. मुकेश अंबानी पेट्रोलिअम, टेलिकॉम, रीटेल आणि टेक्सटाइलचे उद्योजक आहेत. त्यांची मूळ कमाई 42 अब्ज अमेरिकन डॉलर आहे.

बातम्या आणखी आहेत...