आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.50 लाखांपेक्षा जास्त बँक कर्मचा-यांवर बदलीची टांगती तलवार, लिस्ट होतेय फायनल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : पीएनबीमध्ये झालेल्या फ्रॉडनंतर देशाच्या 15.20 टक्के पीएसयू बँक कर्मचा-यांवर ट्रान्सफरची टांगती तलवार आहे. पुढच्या एकदोन दिवसात सर्वच बँक कर्म-यांच्या ट्रान्सफरची फायनल लिस्ट तयार केली जाईल. पंजाब नॅशनल बँकेनेही याची सुरुवात केली आहे. एकट्या पीएनबीने 18 हजार कर्मचा-यांची बदली एका झटक्यात केली आहे. बँकेच्या 25 टक्के कर्मचा-यांची बदली करण्यात आली आहे. बँकेत एकुण 73 हजार कर्मचारी आहेत. पीएसयू बँकांच्या देशामध्ये जवळपास 8 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.यामधील 1.5 लाखांपेक्षा जास्त कर्मचा-यांचे ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.

 

CVC चे आदेशाचा परिणाम
यापुर्वी पीएनबीमध्ये 11500 कोटीं रुपयांचे फ्रॉड समोर आल्यानंतर सेंट्रल विजिलेंस कमीशनने सर्वच बँक कर्मचा-यांना सुचना दिल्या होत्या. जे कर्मचारी 3 वर्षांपासून एकाच पोस्टवर काम करत आहेत. यासोबतच एकाच स्टेशनवर 5 वर्षांपासून जास्त काळापासून काम करत आहे, त्यांचे ट्रान्सफर केले जाईल. अशा सुचना देण्यात आल्या होत्या. पीएनबी फ्रॉडमध्ये समोर आले होते की, मुख्य आरोपी गोकुळनाथ शेट्टी 7 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोस्टवर पोस्टेड होता. याचप्रकारे क्लर्क मनोज खरातही जास्त काळापासून त्याच ठिकाणी काम करत होता. यामुळे 11 हजार कोटींचा घोटाळा करणे सोपे झाले.

 

या आठवड्यात फायनल होईल लिस्ट
बँकिंग इंडस्ट्रीच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सीव्हीसीच्या सख्तीनंतर सर्वच बँक मॅनेजमेंटने लिस्ट तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुढच्या एक दोन दिवसांमध्ये अशा  कर्मचा-यांची लिस्ट तयार करण्यात येईल. 2 वर्ष आणि 5 वर्षांच्या नियमांचे पालन न करणा-या कर्मचा-यांच्या समावेश यामध्ये आहे. सूत्रांनुसार कर्मचा-यांना पुढच्या आठवड्यापासून तात्काळ नवीन ठिकाणी पोस्टिंग देण्यात येईल.

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...