आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • NHAI To Launch Sukhad Yatra App For Highway Travellers With Number Of Facilities

हायवे वरून जाताना Download करा हे सरकारी App, आहे फायद्याचे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - हायवेवरून प्रवासाचा योग येत असल्यास एक मोबाईल अॅप आपल्यासाठी खूप कामाचे ठरू शकते. हे मोबाईल अॅप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority Of India) तयार केले आहे. तसेच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी ते लॉन्च करत आहेत. या अॅपचे नाव सुखद यात्रा असून ते गूगलच्या प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. 8 मार्चपासून ते डाऊनलोड करता येणार आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यास अनेक फायदे मिळतील. ते पुढीलप्रमाणे आहेत.

 

किती वेळ लागेल?
सुखद यात्रा अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे, आपण एखाद्या हायवेवरून निघाल्यास निश्चित ठिकाणी किती वेळात पोहोचू शकाल याची माहिती मिळेल. हे अॅप आपल्याला रिअर टाइम अर्थात लाइव्ह अपडेट देणार आहे. सोबत समोर येणाऱ्या टोल नाक्यावर किती वेळ लागेल याची देखील माहिती मिळेल. ठिकाणांची माहिती आणि तेथे पोहोचताना हायवेवर किती ट्रॅफिक आहे, याचे देखील लाइव्ह अपडेट मिळतील. 


अपघतांची माहिती
या मोबाइल अॅपच्या माध्यमातून आपण स्वतःच्या किंवा महामार्गावरील इतरांच्या अपघातांची माहिती संबंधित विभागाला तातडीने देऊ शकता. जेणेकरून अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळेल. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अॅपच्या माध्यमातून मिळतील या सुविधा...

बातम्या आणखी आहेत...