आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट 2018: आयकरात कुठल्याही प्रकारचा बदल नाही, नोकरदारांच्या पदरी याही वर्षी निराशाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2018-19 च्या अर्थसंकल्पात नोकरीपेशा करणाऱ्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयकर स्लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. त्यामुळे, गतवर्षी लागू केलेला 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नापर्यंतच्या करमुक्तीचा स्लॅब कायम आहे. अर्थमंत्री जेटली यांनी फक्त स्टॅन्डर्ड मेडिकल डिडक्शन 40 हजार रुपये करत असल्याची घोषणा केली. यासोबतच इंडिव्हिजुअल बिझनेस पर्सन आणि नोकरी पेशा करणाऱ्या 2.5 कोटी लोकांना याचा फायदा होईल असे स्पष्ट केले. 

 

- गतवर्षी स्टॅन्डर्ड मेडिकल डिडक्शन 25 हजार रुपये होते. त्यामध्ये 15 हजारांची वाढ अरुण जेटली यांनी केली आहे. 
- आयकरात या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. टॅक्स सवलत आणि सर्व आयकर स्लॅब पूर्वीसारखेच राहतील.
- लघू मध्यम उद्योगांसाठी कॉरपोरेट टॅक्समध्ये 25 टक्के सूट अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केली. कॉरपोरेट टॅक्स आणि सरचार्जमध्ये बदल नाही.
- देशात गेल्या वर्षभरात करदात्यांची संख्या 19 लाखांनी वाढून 8.27 कोटी झाली. त्यांच्याकडून 90 हजार कोटी रुपयांचा आयकर मिळाला आहे. 
- 1.8 कोटी नोकरीपेशा करदात्यांनी प्रत्येकी सरासरी 76 हजार रुपयांचा सरासरी कर भरला. तर 1.88 कोटी इंडिव्हिजुअल बिझनेस पर्सन्सने प्रत्येकी सरासरी 25 हजार रुपयांचा कर भरला असे जेटली म्हणाले.
- यासोबत शेतीजन्य उत्पादने आणि बिझनेससह शेतीवर निगडीत सहकारी संस्थांचा कर 100 टक्के माफ केला जाईल असेही अर्थमंत्र्यांनी मांडले आहे. 

 

हेही वाचा...

बजेट 2018 : 5 वर्षांत असे बदलले आपले इनकम टॅक्‍स स्‍लॅब

बातम्या आणखी आहेत...