आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे रिटेल क्षेत्र वार्षिक १० % दराने वाढत अाहे. त्यातच थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमांत नुकत्याच झालेल्या बदलांमुळे या क्षेत्रात गुंतवणुकीच्या शक्यता वाढतील. त्यामुळे आगामी काही वर्षांत देशातील संघटित रिटेल क्षेत्रात राेजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता अाहे.
तंत्रज्ञान व इंटरनेटच्या युगात शॉपिंग करणे हे तरुणवर्गाचा छंद म्हणून समाेर अाले अाहे. मॉल संस्कृतीनंतर ई-कॉमर्स संकेतस्थळांनी याला नवा अायाम दिला अाहे. यामुळे जगभरात रिटेल क्षेत्र वेगाने वाढत अाहे. भारतातील स्थितीही वेगळी नाही. सरकारने नुकतीच सिंगल रिटेल ब्रॅण्डमध्ये १०० % विदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली अाहे. यामुळे रिटेल क्षेत्र गतिमान हाेण्यास मदत मिळेल. रिटेल क्षेत्र हे रोजगाराचे एक माेठे माध्यम अाहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया व नीती आयोगानुसार पुढील ५ वर्षांत देशाच्या संघटित रिटेल क्षेत्रात २० से २२ लाख रोजगार संधी निर्माण हाेतील. त्यामुळे हे क्षेत्र करिअरचा चांगला पर्याय बनू शकते.
रिटेल उद्याेगाची देशाच्या एकूण जीडीपीत सुमारे १० % भागीदारी अाहे. तसेच देशभरातील एकूण रोजगाराचा ८ % भाग या क्षेत्रातून येताे. एका अहवालानुसार हा उद्याेग २०२६पर्यंत वार्षिक १० % दराने वाढून १६ खर्व डॉलर्सचा होईल. २०१६मध्ये रिटेल उद्याेगाची बाजारपेठ सुमारे ६४१ अब्ज डॉलर्सची हाेती. एप्रिल २०००पासून जून २०१७पर्यंत सुमारे १ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झालीय.
काेणत्याही शैक्षणिक पूर्वेतिहासाचे विद्यार्थी करू शकतात करिअर
काेणत्याही शैक्षणिक पूर्वेतिहासाचे विद्यार्थी यात करिअर करू शकतात. तथापि, माेठ्या पदांवर नाेकरीसाठी एमबीए वा पीजीडीएम करणे जरुरी असते. देशातील विविध संस्थांत रिटेल मॅनेजमेंटचे विशिष्ट अभ्यासक्रम संचालित केले जातात. काेणत्याही शाखेतून पदवी मिळवल्यानंतर रिटेल मॅनेजमेंटच्या एमबीए वा पीजीडीएमला प्रवेश मिळू शकताे. अशाच प्रकारे रिटेल मार्केटिंगचा अभ्यासक्रमही संचालित केला जाताे. एमबीए किंवा पीजीडीएमला प्रवेश कॅट, जॅट, मॅट, सी-मॅट वा एटीएमएचे व्हॅलिड गुण, समूहचर्चा व वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे मिळताे. काही संस्था स्वत:च्या प्रवेश परीक्षाही घेतात. विद्यार्थी फॅशन मर्केंडायझिंंग वा फॅशन रिटेल मॅनेजमेंटचाही अभ्यासक्रम करू शकतात. हे अभ्यासक्रम पदवीपूर्व व पदवीनंतर या दोन्ही स्तरांवर संचालित केले जातात.
पदवीसह काैशल्यही गरजेचे
रिटेल क्षेत्रात करिअर करण्यासाठी पदवीसाेबत संवाद काैशल्याचीही गरज असते. या क्षेत्रात बहुतांश वेळ ग्राहकांशी थेट संवाद साधावा लागताे. त्यामुळे हे काैशल्य अावश्यक अाहे. तसेच हे करिअरच्या विकासासाठीही गरजेचे अाहे. कस्टमर रिटेल असोसिएट ते स्टोअर मॅनेजर व व्हर्च्युअल मर्केंडायझर अादी पदांवर राेजगाराच्या संधी असतात. याशिवाय हे व्यावसायिक लॉजिस्टिक्स अॅण्ड वेअर हाऊस मॅनेजर व रिटेल मार्केट एक्झिक्युटिव्ह म्हणून नाेकरी करू शकतात.
दाेन लाखांपर्यंत वार्षिक वेतन पॅकेज
रिटेल क्षेत्रात प्रारंभी १५ हजार रुपये दरमहाचे वेतन पॅकेज मिळू शकते. एमबीए वा पीजीडीएम केल्यानंतर माेठ्या ब्रॅण्ड्समध्ये चांगल्या पदांवर नाेकरी मिळण्याची शक्यता व तेथे पॅकेजही जास्त असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.