आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सुरक्षा व्यावसायिकांसाठी 29% पर्यंत वाढल्या नाेकरीच्या संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटी, बंॅकिंग व पतपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये सायबर सुरक्षा व्यावसायिकांची मागणी वाढत अाहे. यामागील सर्वात माेठे कारण म्हणजे माेठ्या प्रमाणावर हाेणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सायबर सुरक्षेला वाढता धाेका हे अाहे. 

 

काही दिवसांपूर्वी जपानमधील क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून काही हॅकर्सनी सुमारे ३३ अब्ज रुपयांचे क्रिप्टोकरन्सी चाेरली. या क्षेत्रात अातापर्यंतच्या सर्वात अाधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होताे; परंतु तरीही हॅकर्सना ही चाेरी करण्यात यश अाले. गतवर्षी भारतात अशीच एक घटना घडली हाेती, ज्यात बंॅकांमधून हॅकिंगच्या माध्यमातून चोरी झाली हाेती. तसेच रॅम्सवेअर हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले हाेते. गत काही दिवसांपासून अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांच्या घटनांत वेगाने वाढ झालेली अाहे. परिणामी, देशभरात डिजिटल ट्रॅन्झॅक्शन वा डिजिटल डेटाचे संरक्षण करणाऱ्या कंपन्यांत सायबर सुरक्षा व्यावसायिकांची मागणी वाढली अाहे. 


एका संशाेधन अहवालानुसार देशभरातील विविध कंपन्यांत काम करणाऱ्या सायबर सुरक्षा व्यावसायिकांच्या संख्येत तर ९ % वाढ झाली अाहे; परंतु यांच्या मागणीत २९ % वाढ झाल्याची नाेंद झाली अाहे. तथापि, कंपन्यांसाठी सर्वात माेठी समस्या म्हणजे याेग्य उमेदवाराचा शाेध ही असते. जगभरातील कंपन्यांवर केलेल्या एका पाहणीत ८४ % उमेदवार सायबर सुरक्षा व्यावसायिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या ५० %हूनही कमी उमेदवारांना या पदासाठी योग्य मानत असल्याचे अाढळून अाले हाेते. तसेच ५३ % कंपन्यांना योग्य उमेदवार शाेधण्यास ६ महिने ते एक वर्षाचा कालावधी लागताे. ही समस्या यासाठीही गंभीर अाहे की, जगात २०१९पर्यंत या क्षेत्रात सुमारे २० लाख व्यावसायिकांची गरज भासेल.


दरम्यान, पदवीच्या स्तरावर याचे विशेष असे अभ्यासक्रम नसतात; परंतु आयटी वा संगणक विज्ञानाचे शिक्षण घेणारे किंवा या क्षेत्रात नाेकरी करणारे व्यावसायिक विशेषता मिळवू शकतात. अागामी काळात खासगी क्षेत्रासाेबतच सरकारी कंपन्यांमध्येही सायबर सुरक्षा व्यावसायिकांची मागणी माेठ्या प्रमाणावर वाढणार अाहे.


सायबर सुरक्षा क्षेत्रात अनेक प्रकारच्या विशेषता मिळवता येतात. डेटाच्या सुरक्षेसाठी  संवाद काैशल्य व डेटा ट्रान्सफर करण्याची माहिती असणे अावश्यक अाहे. सॉफ्टवेअरची डिझाइन, रचना व सुरक्षेची माहिती असणे खूपच गरजेचे अाहे. नेटवर्क डोमेन जसे- डिजिटल नेटवर्क, व्हीपीएन, वॅन, लॅन वा  आयपी व्यवस्थापनात विशेषता मिळवण्याकडे सध्या कल अाहे. सुरक्षेत एथिकल हॅकिंग व इन्फॉर्मेशन सुरक्षेची निवड करू शकता. यासाठी सायबर फॉरेन्सिकही एक चांगला पर्याय ठरू शकताे. 


आयटी किंवा संगणक विज्ञानाची पदवी असणे अावश्यक
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आयटी किंवा संगणक विज्ञान वा काॅम्प्युटर अॅप्लिकेशनची पदवी असणे अावश्यक अाहे. भाैतिक, रसायन व गणित हे विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यास प्रवेश घेण्यास पात्र अाहेत. आयटी वा संगणक विज्ञान अाणि अभियांत्रिकीच्या बी.ई. वा बी.टेक.ला ‘जेईई मेन’च्या आधारे प्रवेश मिळताे. आयआयटीत प्रवेश ‘जेईई अॅडव्हान्स्ड’तील गुणांच्या आधारे मिळेल. तसेच संगणक विज्ञानाच्या पदवी अभ्यासक्रमाला किंवा बॅचलर ऑफ काॅम्प्युटर अॅप्लिकेशन कोर्सला संस्थेद्वारे आयोजित प्रवेश चाचणीतील गुणांच्या अाधारे प्रवेश मिळताे. सायबर सुरक्षेत विशेषता मिळवण्यासाठी पदवीनंतर याच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकता. 


सायबर लॉच्या क्षेत्रातही करू शकता करिअर
माहिती-तंत्रज्ञान, संगणक विज्ञान वा लॉमधून पदवी शिक्षण झालेले सायबर लॉच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक विद्यार्थी सायबर लॉचा पदव्युत्तर डिप्लोमा, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकतात. यास प्रवेश चाचणी परीक्षेतील गुणांच्या अाधारे मिळताे. यात सायबर लॉ व सायबर सुरक्षेशी निगडित मूलभूत बाबी, नेटवर्क सुरक्षा, हल्ल्यांचे प्रकार, नेटवर्क सुरक्षेचे धाेके, हल्ले व कच्चे दुवे, सुरक्षेचे उपाय व चांगली सुरक्षा प्रणाली आदीचे शिक्षण दिले जाते. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत यांची मागणी वाढली अाहे. तथापि, काही संस्थांमध्येही याचे अभ्यासक्रम संचालित केले जातात. 


वरिष्ठ स्तरावरही वाढल्या संधी
सायबर सुरक्षा व्यावसायिकांना विविध क्षेत्रांत राेजगाराच्या संधी अाहेत. हे व्यावसायिक अायटी कंपन्यांशिवाय बंॅकिंग अॅण्ड फायनान्शियल उद्याेगातही नाेकरी करू शकतात. यात कनिष्ठ स्तरासाेबतच वरिष्ठ व नेतृत्वाच्या स्तरावरही संधी वाढल्या अाहेेत. एका अहवालानुसार या क्षेत्रात लीडरशिपसाठी व्यावसायिकांच्या मागणीत २५ ते १०० %पर्यंत वाढ झाली अाहे.  


वर्षभरात वेतनामध्ये सरासरी २५ ते ३० %पर्यंतची वाढ
सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल व्यावसायिकांची संख्या कमी असल्याने वेतन पॅकेजमध्ये वाढ झाल्याचे दिसून अाले अाहे. गतवर्षी सरासरी वेतन पॅकेजमध्ये २५ ते ३० %पर्यंत वाढ झाली अाहे. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व्यावसायिकांना ३ ते ४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते. एक-दोन वर्षांच्या अनुभवानंतर या पॅकेजमध्ये ५० %पर्यंत वाढ हाेऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...