आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरही मिळेल पतंजलीचे प्रोडक्ट, ई-कॉमर्स कंपनीसोबत झाली डील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - योग गुरू बाबा रामदेव यांच्या आयुर्वेदने ई-कॉमर्स कंपनीसोबत अॅग्रीमेंट करत ऑनलाइल मार्केट प्लेसमध्ये प्रवेश केला आहे. पंतजलीने आपल्या स्वदेशी श्रेणीच्या एफएमसीजी प्रोडक्ट्चा ऑनलाइन सेल वाढवण्याच्या हेतूने हा करार केला आहे. आता पतंजलीचे सर्व प्रोडक्ट पेटिएम मॉल, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, अॅमेझॉन, नेटमेड्ड, 1 एमजी, शॉपक्लुज आणि इतर वेबसाइटवरही उपलब्ध असेल. कंपनी आतापर्यंत patanjaliayurved.net या पोर्टलवर आपल्या प्रोडक्टचा ऑनलाईन सेल करत होती. 

 

काय म्हणाले रामदेव बाबा?
- बाबा रामदेव म्हणाले की, पारंपारिक मार्केटप्रमाणे हे ऑनलाइन मार्केटमध्येही उपलब्ध व्हावे हा यामागचा उद्देश आहे.
- ते म्हणाले हे निश्चित आहे की स्वदेशी आंदोलन चालु आहे. पंतजलीचे प्रोडक्ट्स बिझनेस पॉलिसीशी तडजोड करुन प्रत्येक घराघरात पोहोचले आहे. 

 

काय म्हणाले आचार्य बालकृष्णन?
पंतजली आयुर्वेदचे सीईओ आणि एमडी आचार्य बालकृष्णन म्हणाले की, नवीन सिस्टम त्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल जे सध्या अधिकतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

 

नवीन सेगमेंटमध्येही उतरली आहे पतंजली
- नुकतेच पतंजलीने किड्स आणि अॅडल्ट डायपर्स आणि स्वस्त सॅनेटरी सेगमेंट्समध्ये एंट्री केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने सोलर इक्युपमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरण्याचे घोषीत केले आहे.
- एफएमसीजी व्यतीरिक्त कंपनी दुसऱ्या सेक्टर्स सारख्या एज्युकेशन आणि हेल्थकेअरमध्येही आहे.
- 2016-17 मध्ये पतंजलीचा टर्नओव्हर 10,500 कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. या फायनाशींयल वर्षामध्ये कंपनीचा उद्देश दोन पटीने वाढला आहे.

 

जलद गतीने वाढत आहे आयुर्वेदिक हेल्थ प्रोडक्ट मार्केट
- नील्सन 2017 च्या रिपोर्टनुसार, आयुर्वेदिक हेल्थ प्रोडक्टचे मार्केट 2021 पर्यंत 1 अब्ज डॉलरचे असेल. 
- रिपोर्टनुसार, आता ग्राहक नैसर्गिक आणि ऑर्गेनिक प्रोडक्टचा वापर पर्सनल केअरमध्ये अधिक करत आहे. अधिकतर लोक फोकस केमिकल बेस्ड प्रोडक्टच्या जागे हर्बल बेस्ड प्रोडक्टचा वापर करतात.

 

पुढील स्लाइवडर वाचा, मल्टी नॅशनल मार्केटमध्ये पतंजली बनली अडथळा...

बातम्या आणखी आहेत...