आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव-मेहुलच्या प्रतिनिधींसोबत पीएनबीच्या झाल्या बैठका, बँकेने पैसे देण्यास सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने ११,३९४ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर चार दिवसांच्या आत सीबीआय आणि रिझर्व्ह बँकेला याची माहिती दिली होती. मात्र, शेअर बाजाराला याची सूचना १० दिवसांनंतर मिळाली. यासंबंधी शेअर बाजाराने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बँकेने एक फाइल दाखल केली असून त्यामध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर बँकेला २५ जानेवारी रोजी या घोटाळ्याची माहिती झाली आणि २९ जानेवारी रोजी सीबीआय तसेच रिझर्व्ह बँकेला याची सूचना देण्यात आली. तर शेअर बाजाराला पाच फेब्रुवारी रोजी माहिती देण्यात आली होती. फाइलनुसार नीरव मोदी यांच्या कंपनीचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक गोकुळनाथ शेट्टी यांच्या संगनमताने बनावट पद्धतीने ११,३९४ कोटी रुपयांचे ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ (एलओयू) घेतले होते. एलओयू एक पद्धतीची हमी असते, त्या आधारावर दुसऱ्या  बँका कर्ज देतात. शेट्टी निवृत्त झाल्यानंतर १६ जानेवारी २०१८ रोजी नीरव यांची एक कंपनी ब्रेडी हाऊस शाखेला एलओयू देण्याची मागणी केली होती. त्या वेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी १०० टक्के नगदी जमा करण्याचे सांगितले होते. त्या वेळी कंपनीने नगदी नसतानाही एलओयू घेत असल्याचे सांगितले. याच्या तपासात हा घोटाळा उघड झाला.

 

कर्ज: एसबीआयचे १३,००० कोटींचे कर्ज जेम्स-ज्वेेेेलरी क्षेत्राला   

 

देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे १,३६० कोटी रुपये अडकले आहेत. युनियन बँकेचेही १,९१५ कोटी रुपये अडकले. पीएनबीच्या एलओयूच्या आधारावर नीरव मोदी यांच्या कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते, अशी माहिती एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली.  बँकेचे एकूण कर्ज १६ लाख कोटी रुपयांचे असून, यातील एका टक्क्यापेक्षाही कमी १३,००० कोटी रुपयांचे कर्ज जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.  

 

सेबी: पीएनबी, गीतांजलीच्या  डिस्क्लोझरची तपासणी सुरू

पीएनबी व गीतांजली जेम्सच्या डिस्क्लोझरची तपासणी सेबीने सुरू केली आहे. गीतांजलीने याच आठवड्यात ठोस कारण न सांगता संचालक मंडळाची बैठक टाळण्याची सूचना केली होती. पीएनबीच्या खात्याची तपासणी करून ऑडिटरांकडून कोणती चूक झाली याचा तपास आयसीएआय करणार आहे.

 

शेअर : पीएनबीत २% तर,  गीतांजलीमध्ये २०% घसरण 

मेहुल चौकसीची कंपनी गीतांजली जेम्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी आणखी २०% घसरण झाली. मार्केट कॅप ३०० कोटी रुपयांच्या घसरणीसह केवळ ४४५ कोटी राहिला. गुरुवारीदेखील कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण झाली होती. पीएनबीच्या शेअरमध्ये २.१० टक्क्यांची घसरण झाली. 

 

दोषी कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी

दोषी कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी उद्योग संघटनांनी केली अाहे. बँकिंग प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींबद्दलदेखील त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एक उपव्यवस्थापकीय पातळीचा अधिकारी इतक्या सर्व बँकांना धोका देण्यात यशस्वी झाला हीदेखील आश्चर्याची बाब असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकही योग्य वेळी हा घोटाळा पकडू शकलेली नाही. 

 

२०१२ मध्ये मेहुलने आयात शुल्क न भरताच केले १,१०० किलो सोने आयात 

मेहुल चौकसीच्या कंपनीच्या वतीने २०१२ मध्ये १,१०० किलोपेक्षा जास्त सोने आणि १३४ पीस हिरे आयातीवर शुल्क भरले नसल्याचे प्रकरण समोर आले होते. माहिती कार्यकर्ता मनोरंजन राय यांनी कस्टम विभागाकडून मिळवलेल्या माहितीत १७१ किलो सोने आयात करून कंपनीने त्यांची नोंदणीच केली नसल्याचे समोर आले होते. राय यांनी १६ ऑगस्ट २०१२ रोजी याची तक्रार प्राप्तिकर विभागात केली होती. या प्रकरणात मागील वर्षी नवीन डीजींनी त्यांना अर्थ मंत्रालयाकडे तक्रार करण्याचे सांगितले होते. अद्याप या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. 

> २०१३ मध्ये शेअर बाजाराचे नियम मोडले असल्याचे समाेर आल्यानंतर गीतांजली जेम्सच्या शेअरच्या ट्रेडिंगवर बंदी घालण्यात आली होती.

 

बातम्या आणखी आहेत...