आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2018 मध्ये चीनला मागे टाकत भारत साधणार प्रगती: जागतिक बँकेचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- भारत सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील सुधारणांमुळे इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था सर्वात तेजीने वाढत असल्याचे जागतिक बँकेने मान्य केले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०१८ मध्ये भारताचा विकास दर सर्वाधिक ७.३ टक्के तर त्या पुढील दोन वर्षे ७.५ टक्के विकास दर राहणार आहे. मोदी सरकारसाठी हा मोठा दिलासा देणारा अहवाल असून, यामुळे विदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे.  


जागतिक बँकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, नोटबंदी आणि वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचा सुरुवातीला धक्का बसला तरी देखील २०१७ मध्ये भारताचा विकास दर ६.७ टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे. प्रत्येक दृष्टीने विचार केला तरी पुढील १० वर्षापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ इतर विकसनशील देशांच्या तुलनेत सर्वाधिक विकास दर नोंदवणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात कमी कालावधीसाठी नाही तर जास्त कालावधीसाठीचा मी विचार करणार असल्याचे जागतिक बँकेच्या ‘डेव्हलपमेंट प्रॉस्पॅक्ट्स ग्रुप’चे संचालक अयान कोस यांनी म्हटले आहे. भारतात विकासाच्या अनेक संधी असल्याचेही 
त्यांनी सांगितले.  

दशकात विकासाच्या मोठ्या संधी  
मागील तीन वर्षांतील विकास दराची आकडेवारी खूपच चांगली राहिली आहे. यामुळे मी अलीकडच्या भविष्यात आर्थिक विकासाच्या अंदाजासाठी चिंतेत नाही. पुढील दशकाचा विचार केल्यास भारतात या दरम्यान ७ टक्के विकास दराची क्षमता आहे.  
-ऐहान कोसे, संचालक, जागतिक बँक  

 

 

दशकात विकासाच्या मोठ्या संधी  
मागील तीन वर्षांतील विकास दराची आकडेवारी खूपच चांगली राहिली आहे. यामुळे मी अलीकडच्या भविष्यात आर्थिक विकासाच्या अंदाजासाठी चिंतेत नाही. पुढील दशकाचा विचार केल्यास भारतात या दरम्यान ७ टक्के विकास दराची क्षमता आहे.  
-ऐहान कोसे, संचालक, जागतिक बँक  

 

 

गतीने विकासासाठी भारताने करावयाचे उपाय  

-  गुंतवणुकीच्या मार्गातील अडचणी दूर केल्याने भारताला खूपच फायदा होईल.  
-  कामगार बाजार, शिक्षण व आरोग्याशी संबंधित सुधारणा लागू कराव्या लागतील.  
- येथे युवकांची संख्या जास्त आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करावा लागेल.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, विकास दराचा अंदाज...

 

बातम्या आणखी आहेत...