आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

999 रुपयांचे JioFi फक्त 499 रुपयांत, वर्षभराच्या प्लानवर कंपनी देणार 500 रुपये Cashback

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क - रिलायन्स जियोने त्यांच्या वाय-फाय डिव्हाइस JioFi साठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे. त्यानुसार हे डिव्हाइस 999 रुपयांऐवजी फक्त 499 रुपयांत मिळत आहे. या ऑफरद्वारे कंपनीकडून 500 रुपयांचे कॅशबॅक दिले जात आहे. पण हे कॅशबॅक डिव्हाइस खरेदी केल्यानंतर एका वर्षाने मिळेल. जियोच्या बेवसाइटनुसार ही ऑफर 3 जुलैपासून सुरू झाली आहे, पण संपणार केव्हा याबाबत माहिती दिलेली नाही. कंपनीने JioFi डिव्हाइस 1,999 रुपयांसह गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केले होते. नंतर त्याची किंमत कमी करून 999 केली होती. 


अशी मिळेल ऑफर  
कंपनीच्या वेबसाईटनुसार JiFi साठी यूझर्सकडे जियो पोस्टपेड सिम असणे गरजेचे आहे. त्यात सलग 12 महिन्यांसाठी म्हणजे एक वर्षासाठी किमान 199 रुपयांचा प्लान घ्यावा लागेल. सलग 12 महिने हा प्लान घेतल्यानंतरच यूझर्सला 500 रुपयांचे कॅशबॅक पोस्टपेड अकाऊंटवर मिळेल. 


हा आहे 199 प्लान 
जियोच्या पोस्टपेड यूझर्ससाठी 199 रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. यात यूझर्सना 25 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड मॅसेजेसची सुविधा मिळते. तसेच जियो अॅप्सचे प्रिमियम सबस्क्रीप्शनही मिळते.  प्रीमियम सब्सक्रिप्शन भी मिलता है।


काय आहे JioFi 
हे एक प्रकारचे 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाइस आहे. या माध्यमातून यूजर्स 4G इंटरनेटचा वापर करू शकतात. या डिव्हाइसची डाऊनलोडींग स्पीड 150 Mbps आणि अपलोडिंग स्पीड 50 Mbps आहे. त्याचबरोबर यात 64 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डही वापरले जाऊ शकते. यात 2300 mAh पॉवरची बॅठरी आहे. ती फुल चार्ज असेल तर 5-6 तासांचे बॅकअप देते. 

बातम्या आणखी आहेत...