आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळे-भाजीपाल्याच्या स्वस्ताईमुळे किरकोळ महागाईत 5.7 टक्के घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फळे व भाज्यांच्या भावात कमी वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाई दरात काहीशी घट आली. जानेवारीत तो ५.०७% होता. डिसेंबर २०१७ मध्ये हा १७ महिन्यांत सर्वात जास्त ५.२१% होता. जानेवारी २०१७ मध्ये किरकोळ महागाई दर ३.२१% राहिला. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे भाव ४.७% वाढले. डिसेंबरमध्ये त्याचा महागाई दर १.५४ टक्क्यांच्या कनिष्ट स्तरावर होता. आठ महिन्यांत हा तिपटीपेक्षा जास्त वाढला आहे.


रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यातील पतधोरणात म्हटले होते की, डिसेंबरमध्ये फळे- भाज्यांचे भाव कमी झाले. मात्र, भावाची घसरण गेल्या काही वर्षांतील तुलनेत कमी झाली. रिझर्व्ह बँकेने महागाई वाढीची शक्यता पाहता व्याजदरात कपात केली नव्हती. त्यांच्या अंदाजानुसार जानेवारी-मार्चमध्ये महागाई दर ५.१% राहील.

 

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन विकासात घट
डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचा विकास दर घसरला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे आयआयपीमध्ये ७.१% वाढ झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये यात ८.८% व डिसेंबर २०१६ मध्ये २.४ वाढ राहिली होती. नोव्हेंबरचा विकास दर १९ महिन्यांत सर्वात जास्त होता. आयआयपीमध्ये ७७.६३% भागीदारी राखणाऱ्या उत्पादन क्षेत्रानेही चांगली कामगिरी केली. यामध्ये ८.४% विकास दर नोंदला. हा वर्षभरापूर्वी केवळ ०.६% होता. उत्पादन क्षेत्रात २३ उद्योग क्षेत्र समाविष्ट आहेत. यामध्ये १६ मध्ये वाढ नोंदली. गुंतवणुकीचा संकेत मानल्या जाणाऱ्या भांडवली मालाचे उत्पादन १६.४% वाढले, डिसेंबर २०१६ मध्ये हे ६.२% वाढले होते. एफएमसीजी उत्पादनाची मागणीही ०.२% च्या तुलनेत १६.५% वाढली आहे. असे असले तरी वेगवान वाढीचे कारण बेस इफेक्ट आहे. नोटबंदीमुळे डिसेंबर २०१६ मध्ये विकासदर खूप कमी होता. टीव्ही-फ्रिजची उत्पादन वाढ ०.९% राहिली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, डिसेंबर-जानेवारीत भावातील चढ-उतार... 

बातम्या आणखी आहेत...