आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी भारतीयांच्या पैशातून कामाला सुरुवात करणारी देशातील पहिली बँक; लालाजींचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएनबी बँकेची सुरुवात लाहोरपासून झाली, त्या वेळी भारत-पाक फाळणी झालेली नव्हती.  १९ मे १८९४ रोजी लाहोरच्या अनारकली बाजारात मुख्य कार्यालयासह बँकेची नोंदणी झाली. २३ मे रोजी संचालक मंडळाची पहिली बैठक झाल्यानंतर वसंत पंचमीच्या एक दिवस आधी (१२ एप्रिल १८९५) बँकेची शाखा सुरू झाली होती.  


स्वदेशी अभियान 

 संस्थापक सदस्य व पहिल्या संचालक मंडळात दयालसिंह मजेठिया (ट्रिब्यूनचे संस्थापक), लाला हरकिशन लाल (पंजाबचे पहिले उद्योगपती), काली प्रसन्न रॉय (वकील), इसी जेस्सावाला (पारसी उद्योगपती), प्रभू दयाल (सुलतानचे श्रीमंत), जयशी राम बक्षी (वकील), लाला डोलन दास (बँकर) व लाला लजपतराय यांचा समावेश होता. यातील अनेक जण स्वदेशी अभियानाशी जोडलेले होते.  


संस्थापकांचेे कमी शेअर

पूर्णपणे भारतीयांच्या पैशाने कामाला सुरुवात करणारी ही पहिली बँक आहे. सर्वधर्मसमभावाची प्रेरणा घेऊन एक शीख, एक पारसी, एक बंगाली आणि काही हिंदूंनी मिळून बँकेचा पाया रचला होता. बँकेचे नियंत्रण इतर शेअरधारकांकडे असावे यासाठी  ७ संचालकांनी अत्यंत कमी शेअर घेतले.

 

हाँगकाँग अन् काबूलमध्येही आहेत शाखा 

 

पंजाब नॅशनल बँकेचे राष्ट्रीयीकरण १३ इतर बँकांसोबत जुलै १९६९ मध्ये झाले. छोट्याशा सुरुवातीनंतर आज देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. पंजाब नॅशनल बँकेचे ब्रिटनमध्ये बँकिंग सहायक उपक्रम आहेत. हाँगकाँग आणि काबूलमध्ये शाखा तसेच अलमाटी, शांघाय आणि दुबईमध्ये प्रतिनिधी कार्यालये आहेत.  

 

कार्यालय गेले तरीही काम सुरूच ठेवले  

 

१९०० मध्ये पहिल्यांदा शाखा लाहोरच्या बाहेर कराची-पेशावरमध्ये सुरू झाली होती.  
१९४० मध्ये डेहराडूनच्या ‘भगवान दास बँक’चे विलीनीकरण केले.  
१९४७ मध्ये लाहोर कार्यालय गमवावे लागले तरीही काम सुरू ठेवले. ३१ मार्च १९४७ रोजी लाहोर उच्च न्यायालयाने कार्यालयाला दिल्लीत नोंदणी करण्याची परवानगी दिली.  
१९५२ मध्ये भारत बँकेचे अधिग्रहण केले. त्या वेळी ३९ शाखा होत्या.  
१९७९ मध्ये १३ इतर बँकांसोबत या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गांधीजींसह यांचीही खाती..

बातम्या आणखी आहेत...